१, २ नाही तर १२ पेग डाऊन होता वरुण धवन; शूटिंगदरम्यानचा हा किस्सा वाचा

varun dhawan
varun dhawan

अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. २०१२ मध्ये या दोघांनी 'स्टुडंट ऑफ द इअर' या चित्रपटातून एकत्र बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला आणि वरुण-आलियाच्या जोडीचंही प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक झालं. नंतर हे दोघं २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बद्रिनाथ की दुल्हनियाँ' या चित्रपटात एकत्र झळकले. पुन्हा एकदा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला आणि वरूण-आलियाची केमिस्ट्रीसुद्धा प्रेक्षकांना भावली. शशांक खैतान दिग्दर्शित या चित्रपटाला आज चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा त्यावेळी खूप चर्चेत होता. चित्रपटात बद्रिची भूमिका साकारणाऱ्या वरुणने सेटवरच मद्यपान केलं होतं. 

चित्रपटातील एका सीनमध्ये बद्रिने मद्यपान केल्याचं दाखवायचं होतं. या सीनला पूर्ण न्याय देण्यासाठी वरुणने मद्यपान करून सीन शूट करायचा निर्णय घेतला. यासाठी तो एक, दोन नव्हे तर बारा पेग डाऊन होता असं म्हटलं जातं. यानंतर वरुणने तो सीन उत्तमरित्या शूट केलं आणि ते पाहून दिग्दर्शकसुद्धा खूश झाले होते. मात्र त्याचा परिणाम सीन शूट झाल्यानंतर सेटवरील टीमला भोगावा लागला. वरुणला सांभाळणं सर्वांसाठी कठीण झालं होतं आणि अखेर आलियाने टीम मेंबर्सची मदत केली. 

धर्मा प्रॉडक्शन्सच्या बॅनरअंतर्गत प्रदर्शित झालेला हा चित्रपट २०१४ मधल्या 'हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ' या चित्रपटाचा दुसरा भाग होता. शशांक खैतानचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट होता. जगभरात या चित्रपटाने तुफान कमाई केली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com