Dilip Kumar | दिलीप कुमारांच्या आठवणींनी सायरा बानो भावूक, डोळ्यातून आश्रू! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dilip kumar saira bano

Dilip Kumar | दिलीप कुमारांच्या आठवणींनी सायरा बानो भावूक, डोळ्यातून आश्रू!

सात जुलै रोजी म्हणजे उद्या गुरुवारी प्रसिद्ध अभिनेता दिलीप कुमार यांचे पहिले पुण्यस्मरण आहे. दिवंगत अभिनेत्याचा गेल्या वर्षी सात जुलै रोजी निधन झाले होते. दिलीप कुमार यांच्या जाण्याने पूर्ण बाॅलीवूड (Bollywood) उद्योगाला झटका बसला होता. दुसरीकडे त्यांच्या पत्नी सायरा बानो यांना धक्का बसला होता. दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्या निधनानंतर सायरा बानो (Saira Banu) यांनी सर्वांशी अंतर राखले होते. आता अभिनेत्याच्या पहिल्या पुण्यस्मरणापूर्वी सायरा यांनी दिलीप कुमारांविषयी एक भावनिक पत्र लिहिले आहे. (Dilip Kumar Death Anniversary Sira Banu Write Emotional Note On His Husband)

हेही वाचा: भगवान वाल्मिकींविषयी वादग्रस्त विधान, अभिनेता राणा जंग बहादूरांना अटक

यात सायरा यांनी व्यतीत केलेले क्षण, अभिनेत्याविषयी त्यांचे प्रेम आणि इतर अनेक विषयांवर लिहिले आहे. अभिनेत्रीची हे पत्र खूपच भावनिक आहे. सायरा बानो यांनी दिलीप कुमारबरोबर सगीना, बैराग आणि गोपी या चित्रपटांमध्ये काम केले होते. सायरा म्हणतात, त्यांना दिलीप यांच्या बरोबर व्यतीत केलेले पाच दशकांपेक्षा अधिक आठवणी त्यांना पुढे जाण्यास बळ देत असतात. सायरा यांनी पत्र शेअर केले आहे. त्यात लिहिले आहे, की झोपताना मी आपला चेहरा दुसरीकडे करते आणि आपला चेहरा उशीने दाबते. त्यानंतर झोपण्याचा प्रयत्न करते. मला वाटते असे करुन मी जेव्हा डोळे उघडते तेव्हा त्यांना माझ्याजवळच पाहाते. त्यांचे गुलाबी गाल, सकाळी सूर्याच्या किरणांमुळे उजळतात. मला मान्य करावे लागेल की मी खूप भाग्यशाली आहे. मला युसूफची साथ ५६ वर्षांपेक्षा जास्त काळ मिळाली.

हेही वाचा: मित्र सिद्धार्थची आठवण येताच विद्युत जामवाल होतो भावूक, 'आईने खूप शिकवले'

सगळ्या जगाला माहीत आहे, की १२ वर्षांपासूनच मी त्यांच्यावर प्रेम करायला लागले. मी त्यांचे स्वप्न पाहूनच मोठी झाले. अनके तरुण मुली सौ दिलीप कुमार बनण्याचे स्वप्न पाहात होत्या. मी त्या सर्वांना मागे टाकत स्वतः सर्वात पुढे आले. त्या पुढे लिहितात, जेव्हा त्या दिलीप कुमार यांचा फोटो पाहातात किंवा कोणी त्यांचा उल्लेख करतो त्यावेळी मी माझे आश्रू रोख शकत नाही. आयुष्यातील असा कोणताही क्षण नाही जेथे ते माझ्या डोळ्यांसमोरुन दूर जात नाहीत. जर कोणतेही चॅनल लावले आणि त्यांचा चित्रपट दाखवला जाणार असेल तर माझा कर्मचारी ते पाहातात. मात्र मी त्यांच्याबरोबर नसते. कारण मी खूपच भावनिक होऊन जाते. मी त्यांचा कोणताही फोटो पाहून आपले आश्रू रोखू शकत नाही. दिलीप कुमार यांचे खरे नाव यूसफ खान होते. त्यांचा पहिला चित्रपट ज्वार भाटा होता. तो १९४४ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यांचा शेवटचा चित्रपट किला १९९८ मध्ये आला होता.

Web Title: Dilip Kumar Death Anniversary Sira Banu Write Emotional Note On His Husband

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..