esakal | मेहूल चोक्सीच्या स्टोरीनं दिली 'वेबसीरिजची आयडिया'
sakal

बोलून बातमी शोधा

mehul choksi and madhur bhandarkar

मेहूल चोक्सीच्या स्टोरीनं दिली 'वेबसीरिजची आयडिया'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - भारतात मोठमोठे आर्थिक घोटाळे करुन परदेशात निघून गेलेल्या व्यक्तींवर वेबसीरिज (webserise) बनवण्याची कल्पना पुढे येते आहे. त्यात आता प्रसिध्द दिग्दर्शक मधुर भांडारकर (madhur bhandarkar) यांचाही समावेश आहे. त्यांनी सोशल मीडियावर (social media tweet) एक व्टिट करुन त्याविषयी माहिती दिली आहे. यापूर्वी नेटफ्लिक्सवर विजय माल्या (vijay mallya), सुब्रतो रॉय (subroto roy), नीरव मोदी (nirav modi) यांच्यावर एक माहितीपट तयार करण्यात आला होती. आता मेहूल चोक्सीवर वेबसीरिज बनवण्याची आयडिया मिळाल्याचे भांडारकर यांनी सांगितलं आहे. ( director madhur bhandarkar get idea from mehul choksi alleged girlfriend barbara jarabica says mini series or film)

मधुर भांडारकर (madhur bhandarkar) यांची ती पोस्ट सध्या सोशल मीडियावर (social media) मोठया प्रमाणात व्हायरल झाली आहे. त्याला चाहत्यांकडून काही गंमतीशीर प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत. सध्या मेहूल चोक्सी हा कॅरिबियन देश डोमेनिकामध्ये अटकेत आहे. काही दिवसांपासून तो भारतात परतणार का याविषयी चर्चा सुरु आहे. तो त्याची गर्लफ्रेंड बारबरा जराबिका चर्चेत आहेत. बारबरानं असं सांगितलं आहे की, ती मेहूल चोक्सीची गर्लफ्रेंड नाही. त्याला क्युबाला जायचे होते. असा दावा तिनं केला आहे. यासगळ्या प्रकरणावर भांडारकर यांना चित्रपट तयार करण्याची कल्पना सुचली आहे.

madhur bhandarkar news

madhur bhandarkar news

हेही वाचा: मिलिंदसोबत फॅमिली प्लॅनिंग कधी करणार? अंकिताच्या उत्तराने वेधलं लक्ष

हेही वाचा: सारा-सुशांतने ड्रग्ज घेतलं का? नितीश भारद्वाज म्हणाले..

मेहूल चोक्सी आणि बारबरा जराबिका यांच्याविषयी माहिती गोळा केल्यानंतर त्यांच्याबद्दल मधुर भांडारकर यांनी व्टिट केले आहे. त्यात ते म्हणतात यासगळ्या घटनाक्रमावर एक छोटीसी वेब सीरिज किंवा चित्रपट बनवायला हवा. त्यानंतर त्यांनी एक स्मायलीची इमोजी शेअर केली आहे. भांडारकर यांचे हे व्टिट लोकांना आवडले आहे. फॅन्सनं त्यांना सांगितलयं की, चांगल्या कामाला उशिर करु नका. तुम्ही लवकर त्याच्या शुटिंगला सुरुवात करा. असा सल्ला चाहत्यांनी त्यांना दिलायं.