अकोल्याचा दिग्दर्शक वैभव पल्हाडे सिनेसृष्टीवर पाडणार '७२ रुपयांचा पाऊस'

लवकरच माझ्या चाहत्यांना माझ्या चित्रपट आणि वेब सिरीजद्वारे एक मोठे सरप्राईज देणार आहे.
cinema
cinemaesakal

दिग्दर्शक वैभव पल्हाडे याने त्याच्या आगामी प्रोजेक्टसची घोषणा केली आहे. एका मुलाखतीद्वारे, त्याने सांगितले की तो आगामी मराठी फीचर फिल्म "७२ रूपयांचा पाऊस" आणि वेब सिरीज "द कर्स ऑफ भद्रावती" मध्ये लेखक आणि दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. त्याच वेळी, हा मराठी चित्रपट चाहत्यांना २०२३ मध्ये सिनेमागृहात पाहायला मिळेल आणि २०२४मध्ये ओटीटीवर वेब सिरीज प्रदर्शित होईल. चित्रपट आणि मालिकेची कथा कशी असेल यावर दिग्दर्शकाने विशेष चर्चा केली नाही. पण, त्याने त्याच्या चाहत्यांसाठी हे एक मोठे सरप्राईज म्हटले आहे.

लवकरच चाहत्यांना सरप्राईज मिळेल

वैभव म्हणतो, “मी लवकरच माझ्या चाहत्यांना माझ्या चित्रपट आणि वेब सिरीजद्वारे एक मोठे सरप्राईज देणार आहे. मला आशा आहे की प्रेक्षकांना माझे सर्व लघुपट “थोडीशी लिटल, मीनाज, इरा, डायरी, मी पोरस” आवडतील. ,द लास्ट डोअर, आय एम पोरस, त्याचप्रमाणे आगामी दोन्ही प्रकल्प खूप आवडतील.”

हिंदी चित्रपटांतही काम केले आहे

वैभवने मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तसेच, २०२० मध्ये लॉक-डाऊन दरम्यान, त्यांनी त्यांची "सजना रे" ही कादंबरी प्रकाशित केली होती, जी लोकांना खूप आवडली होती. अलीकडेच, त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याच्या आगामी प्रकल्पांची घोषणा केली होती. त्यानंतर त्याचे चाहते त्याच्या आगामी प्रकल्पांसाठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

cinema
KRK Arrest: बॉलीवूडविरोधात 'टिवटिव' करणारा 'केआरके' किती कोटींचा मालक?

वैभव यांना हे पुरस्कार मिळाले आहेत

दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल २०१७ मध्ये त्याच्या "आय एम पोरस" आणि "द लास्ट डोअर" या लघुपटांची देखील निवड झाली होती. त्याचबरोबर ‘द लास्ट डोअर’ या लघुपटाचीही आशा चित्रपट महोत्सवात आठ पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. इतकंच नाही तर लघुपट महोत्सव २०१९मध्ये वैभव पऱ्हाडे यांच्या ‘डॅडी देशमुख’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि संकलकाचा पुरस्कार मिळाला आहे.

हॉलिवूड म्युझिक अल्बम सिरीजचे दिग्दर्शन करणार आहे

वैभवने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्या पोस्टमध्ये लिहिले की, "अमेरिकन संगीतकार टर्न अप टोबीच्या पंढरा संगीत अल्बमची मालिका दिग्दर्शित करणार आहे. बरं, ही काही पहिलीच वेळ नाही. वैभव आणि टर्न अप टोबी यांनी यापूर्वी एकत्र काम केले आहे. होय, वैभव पल्हाडे दिग्दर्शित ‘मीनाझ’ या चित्रपटासाठी टर्न अप टोबीने संगीत दिले आहे." त्यामुळे आता महाराष्ट्रातील या पठ्ठ्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाजणारा डंका पाहण्यासाठी सिनेरसिक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com