रिअल लाईफमध्ये जेठालाल आणि दयाबेनचं कसं आहे नातं? दिशा वकानीचा खुलासा

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका मनोरंजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय मालिका आहे.
रिअल लाईफमध्ये जेठालाल आणि दयाबेनचं कसं आहे नातं? दिशा वकानीचा खुलासा

मुंबई - तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका मनोरंजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. दीड दशकांहून अधिक काळ या मालिकेनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्या मालिकेतील सर्व पात्रं ही आता प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. दयाबेन ही मालिकेतील एक प्रसिद्ध व्यक्तिरेखा. ती भूमिका दिशा वकानी यांनी साकारली आहे. आज त्यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्तान त्यांच्या या मालिकेच्या संदर्भातील ज्या आठवणी आहेत त्यांना उजाळा दिला आहे. जेठालालची भूमिका दिलीप जोशी यांनी साकारली आहे. ही जोडी प्रेक्षकांमध्ये कमालीची लोकप्रिय झाली आहे. रील लाईफमध्ये या दोघांनीही प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे. त्यामुळे रिअल लाईफमध्ये या दोघाचं नातं कसं आहे, असा प्रश्न चाहत्यांना नेहमीच पडतो.

दिशा वकानी यांना रिअल लाईफमध्येही आता लोकं दयाबेनच्याच नावानं हाका मारतात. अशी प्रतिक्रिया दिशा यांनी एका मुलाखतीमध्ये दिली होती. यावरुन त्या मालिकेची लोकप्रियता आणि त्यातील व्यक्तिरेखांवर प्रेम करणारे प्रेक्षक यांची कल्पना येते. सप्टेंबर २०१७ मध्ये त्यांनी त्या मालिकेतून वैयक्तिक कारणास्तव सुट्टी घेतली. त्यामुळे त्यांची जागा दुसऱ्या अभिनेत्रीनं घेतली अशीही चर्चा होती. मात्र अजूनही त्यांची जागा दुसऱ्या कुण्या अभिनेत्रीनं घेतलेली नाही. काही काळ रिपिट टेलिकास्ट दाखवून या मालिकेचा प्रेक्षकवर्ग टिकवून ठेवण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी केला होता.

दिलीप जोशी आणि दिशा वकानी यांची जोडी त्या मालिकेपासून लोकप्रिय झाली. ती एवढी लोकप्रिय आहे की, वेगवेगळ्या रिअॅलिटी शो मध्ये देखील प्रेक्षकवर्ग कॅश करण्यासाठी त्यांना बोलावले जाते. यावरुन त्या मालिकेच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. दिलीप आणि दिशा यांचे टायमिंग, त्यांचे संवाद, हावभाव त्यांना मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद मोठा आहे. सोशल मीडियावरही हे सेलिब्रेटी अॅक्टिव्ह असल्याचे दिसून आले आहे. ते सतत आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. डेक्कन क्रॉनिकलला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये दिशा वकानी यांनी आपल्याला दिलीप जोशी यांच्या आवडी- नावडीविषयी सांगितलं. दिलीप जोशी यांनी सांगितलं की, आम्ही एकमेकांचा सन्मान करतो. आणि आम्ही फार प्रोफेशनली विचार करणारे कलाकार आहोत. त्यामुळे एकत्र काम करताना त्याचा काही त्रास होत नाही.

रिअल लाईफमध्ये जेठालाल आणि दयाबेनचं कसं आहे नातं? दिशा वकानीचा खुलासा
कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी, अभिनेता आनंद कन्नन यांचे निधन
रिअल लाईफमध्ये जेठालाल आणि दयाबेनचं कसं आहे नातं? दिशा वकानीचा खुलासा
'ती बोगस अभिनेत्री', विधू विनोद चोप्रा कुणाबद्दल बोलले?

ऑफ स्क्रिन आमच्यात चांगले बाँडिंग असल्याचे दिशा वकानी यांनी सांगितलं. आम्ही कधीही एकमेकांबद्दल तक्रारी करत नाही. एकत्र काम करणं, आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करणे ही गोष्ट लक्षात ठेवुन सेटवर आमचे काम सुरु असते. यात कुठल्याही प्रकारचे हेवेदावे नसतात. दिलिप यांचं आपल्या कुटूंबावर जेवढं प्रेम आहे ते पाहून मला त्यांचा नेहमी अभिमान वाटतो. मला त्यांच्याविषयी कुठलीच तक्रार नसल्याचेही दिशानं यावेळी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com