esakal | 'सविता भाभी'चा वाद संपला; "अश्‍लील उद्योग मित्रमंडळ'ची वाट मोकळी
sakal

बोलून बातमी शोधा

dispute on Savita Bhabhi solved regarding Ashlil Udyoy Mitramandal

'सविता भाभी'चा वाद संपला; "अश्‍लील उद्योग मित्रमंडळ'ची वाट मोकळी

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : "अश्‍लील उद्योग मित्रमंडळ' या मराठी चित्रपटातील "सविता भाभी' या पात्रावरून कॉपीराईटचा वाद उद्‌भवला होता. या वादामुळे चित्रपट प्रदर्शित होणार की नाही अशा विवंचनेत दिग्दर्शक व निर्माते होते. परंतु त्यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखविला आणि हा वाद न्यायालयात जाण्यापूर्वी आपापसामध्ये चर्चा करून मिटविला आहे.

'वहिनी' म्हणताच, जेनेलिया खुदकन हसली

आता या चित्रपटातील "सविता भाभी' या नावाचा उल्लेख टाळण्यात येणार आहे. सविता भाभी हे कॉमिकबुकमधलं एक काल्पनिक पात्र आहे. या कॉमिक पात्राचे कॉपीराईट डॉ. निलेश गुप्ता यांच्याकडे आहेत आणि या पात्रावरून निलेश गुप्ता यांच्याकडून चित्रपटांच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. कॉपीराईट माझ्याकडे असतानाही चित्रपटाच्या निर्मात्यांनी माझ्याकडून कोणतीही परवानगी घेतली नाही, असे डॉ. निलेश गुप्ता यांचे म्हणणे आहे. यामुळे नीलेश गुप्ता आणि अंबरिश दरक यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. परंतु आता तो त्यांनी आपसामध्ये मिटविला आहे. त्यानुसार या चित्रपटातील "सविता भाभी' या पात्राच्या नावाचा उल्लेख काढून टाकण्यात येणार आहे.

अखेर अनुष्काचं ठरलं! या दिग्दर्शकाशी बांधणार लग्नगाठ

याबाबत चित्रपटाचे निर्माते अंबरीश दरक म्हणाले, की "आम्ही या चित्रपटाच्या सविता भाभी या पात्राच्या कॉपीराईटसाठी पुनित अग्रवाल उर्फ देशमुख यांच्याकडे रितसर अर्ज केला होता. आणि त्यांच्याकडून आम्हाला परवानगीसुद्धा मिळाली होती. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाची प्रसिद्धी सोशल मीडियावरून व्हायला लागली, त्या काळातच डॉ. निलेश गुप्ता यांच्याकडून आम्हाला कायदेशीर नोटीस आली. त्यावेळी आमच्या लक्षात आले की पुनित अग्रवाल यांच्याकडून निलेश गुप्ता यांनी ते कॉपीराईट घेतले आहेत.

थोडक्‍यातच या संपूर्ण प्रकरणात आमची फसवणूक करण्यात आली. कायदेशीर नोटीस आल्यानंतर हा वाद न्यायालयात रंगणार असं चित्र आम्हाला दिसू लागलं होतं. परंतु असं काहीही होऊ न देता, मी आणि निलेश यांनी एकमेकांशी चर्चा करून हा वाद संपवला आणि चित्रपटात ज्या-ज्या ठिकाणी "सविता भाभी' या पात्राचा उल्लेख आहे तो काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अर्थात सविता भाभी असा उल्लेख ज्या ज्या पात्रांच्या तोंडी आहे तेथे तेथे तो शब्द म्यूट करण्यात येणार आहे.' 

कंगनाची बहिण मोदींना म्हणतेय, 'मौका दो'!

या चित्रपटात सविता भाभीची भूमिका अभिनेत्री सई ताम्हणकर साकारणार आहे. तर सईसोबत अभिनेत्री पर्ण पेठे, सायली पाठक, अभिनेता अभय महाजन, अक्षय टांकसाळे, अमेय वाघ, ऋतूराज शिंदे, केतन विसाळा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन आलोक राजवाडे यांनी केले आहे.

loading image