बांदेकर भावोजींसमोर रामदास आठवलेंचा मजेदार उखाणा | Ramdas Athawale | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdas Athawale with wife

बांदेकर भावोजींसमोर रामदास आठवलेंचा मजेदार उखाणा

sakal_logo
By
स्वाती वेमूल

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या पत्नी या कार्यक्रमात सहभागी होणार असून हा विशेष भाग लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. रामदास आठवले आले, की त्यांनी काहीतरी चारोळी सादर करणं अपेक्षितच आहे. आठवलेंना छोट्या आणि खुमासदार कविता करण्याचा छंदच आहे हे देखील सगळ्यांना ठाऊक आहे. शीघ्रकवी असलेल्या रामदास आठवले यांनी असाच एक मजेदार उखाणा कार्यक्रमात घेतला. बांदेकर भावोजींनी लग्नाची तारीख विचारली असताना आठवले यांनी स्वतःच्या अंदाजात उखाणा घेतला - 'माझ्या लग्नाची तारीख आहे सोळा, म्हणून हिच्यावर होता माझा डोळा'. त्यांचा हा मजेदार उखाणा ऐकून बांदेकर भावोजींसोबत सगळेच हसून लोटपोट झाले.

हेही वाचा: 'तारक मेहता..'मधील 'सोनू'ने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

होम मिनिस्टरचा हा विशेष भाग १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

loading image
go to top