esakal | Documentary: भाईजानच्या आयुष्यातील 'गुपित' उलगडणार...
sakal

बोलून बातमी शोधा

Documentary: भाईजानच्या आयुष्यातील 'गुपित' उलगडणार...

Documentary: भाईजानच्या आयुष्यातील 'गुपित' उलगडणार...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा (bollywood) भाईजान म्हणून सलमान खान (salman khan) त्याच्या चाहत्यांना माहिती आहे. त्याची ओळख तो वेगवेगळ्या प्रकारे निर्माण करताना दिसतो. कधी कुणाला नावं ठेवून, वाद तयार करुन, आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे चाहत्यांना सांगण्यासाठी सलमानची प्रत्येक गोष्ट त्याच्या सहकलांकारापेक्षा वेगळी असते. त्याच्या चित्रपटाचे प्रमोशनही चाहत्यांसाठी वेगळा विषय असतो. सलमान त्याच्या हटकेपणाबद्दल परिचित आहे. बॉलीवूडमध्ये सर्वांच्या मदतीला धावणारा अभिनेता म्हणूनही तो ओळखला जातो. नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सलमानवर आता एका डॉक्यु सीरिजची निर्मिती केली जाणार आहे. त्याच्या प्रॉडक्शनला सुरुवात झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सलमानच्या प्रत्येक चित्रपटाबद्दल त्याच्या चाहत्यांना कमालीची उत्सुकता असते. इंडिया टूडेनं दिलेल्या माहितीनुसार सलमान खान या व्यक्तिमत्वाशी संबंधित अनेक पैलू त्याच्या बियाँड द स्टार नावाची सीरिज चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे. यामध्ये सलमानच्या स्टारपदापर्यतचा प्रवास अधोरेखित करण्यात आला आहे. सलमानच्या कौटूंबिक घडामोडींबद्दलही त्यात माहिती देण्यात येणार आहे. त्याविषयी त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. याशिवाय सलमानचे मित्र, नातेवाईक, सहकारी कलाकार यांच्याही मुलाखती त्यामध्ये असणार आहे.

गेल्या चार दशकांहून अधिक काळ सलमान खान हा बॉलीवूडमध्ये कार्यरत आहे. त्यानं त्याच्या अभिनयानं मोठं यश मिळवलं आहे. मात्र तो कित्येकदा त्याच्या या स्टारडममुळे अडचणीतही आला आहे. त्याला कोर्टाची पायरी चढावी लागली आहे. त्याला त्याच्या बेतालपणाची किंमतही चूकवावी लागली आहे. काही दिवसांपूर्वी तो शाहरुखच्या घरी गेला त्यावरुन त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. त्याचे कारण आर्यन खानला झालेली अटक. शाहरुखला सपोर्ट करण्यासाठी तो त्याच्या भेटीला गेला होता. मात्र ट्रोलर्सला ही गोष्ट खटकल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: आर्यनच्या अटकेनंतर सलमान खान पोहोचला शाहरुखच्या घरी!

हेही वाचा: सलमान आणि आयुषचं ‘अंतिम- द फाइनल ट्रुथ’: पोस्टर व्हायरल

सलमानचं इतर कलाकारांबरोबर असणारं नातं, त्याचं वागणं, बोलणं, त्याच्या प्रतिक्रिया, त्याचे उमटलेले पडसाद या साऱ्यांचा वेध त्या माहितीपटामध्ये घेण्यात आला आहे. सध्या त्याचे काम सुरु झाले आहे. या माहितीपटामध्ये अभिनेत्याचं वलय सोडून रियल लाईफमध्ये सलमान खान कसा आहे हे दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ याच्याबद्दल जाणून घेता येणार आहे. या माहितीपटाची निर्मिती सलमाननं केली असून त्यात विझ फिल्म आणि अॅपलॉझ एन्टरटेनमेंट हे सहनिर्माते म्हणून सहभागी झाले आहेत. पिंकविलानं दिलेल्या माहितीनुसार, या माहितीपटाचे काम सुरु झाले आहे.

loading image
go to top