पती-पत्नी आणि बेडरूम यातलं छळाचं वास्तव चित्रण दाखवणारे 5 चित्रपट

टीम ई सकाळ
Monday, 28 December 2020

चित्रपट हे मनोरंजनाचं साधन असले तरी त्यातून समजातील अनेक वास्तवदर्शी घटना मांडल्या जातात. समाजातील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, प्रेक्षकांनाकांना दाहक वास्तवाची जाणीव करून देण्याचं काम काही चित्रपट करतात.

चित्रपट हे मनोरंजनाचं साधन असले तरी त्यातून समजातील अनेक वास्तवदर्शी घटना मांडल्या जातात. समाजातील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, प्रेक्षकांनाकांना दाहक वास्तवाची जाणीव करून देण्याचं काम काही चित्रपट करतात. काही चित्रपट दिग्दर्शक त्यांच्या अशा मांडणीसाठी ओळखले जातात. ते चित्रपटातून वास्तवाच्या जवळ जाणारं कथानक दाखवतात.

सर्वसामान्यपणे डेली सोपमध्ये घर आणि त्याभोवती फिरणारं कथानक असतं. त्यात सासू - सून, सुनेचा छळ इत्यादी गोष्टींचा भडीमार केला जातो. पण त्यात चित्रपटाइतकं भडकपणे दाखवलं जात नाहीत. घरागुती हिंसाचार आणि मॅरिटल रेप सारख्या घटनांवर चित्रपटातून थेट भाष्य याआधी अनेक चित्रपटांमधून करण्यात आलं आहे. चित्रपटात नायिकेला पती किंवा कुटुंबाकडून छळ सहन करावा लागतो असं दाखवण्यात येतं. पती-पत्नी आणि चार भिंतीच्या आतील वास्तव पडद्यावर खूपच भयावह असं दाखवलं जातं. कदाचित प्रत्यक्षात परिस्थिती यापेक्षाही भयंकर असू शकते.

क्रिमिनल जस्टिस सिझन 2 (2020)
पंकज त्रिपाठी यांची भूमिका असलेली वेबसिरीज क्रिमिनल जस्टिस ही घरगुती हिंसाचारावर आधारीत आहे. यात नायिकेचा पती तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करतो. अनेक त्रास सहन केल्यानं तिच्या डोक्यावर परिणाम होतो आणि त्यातच ती पतीला मारून टाकते. पश्चाताप आणि भावनेच्या भरात गुन्हा मान्य करते. त्यानंतर अशा एका गुन्हेगाराला न्याय देण्यासाठी प्रयत्न होतात जो प्रत्यक्षात गुन्हेगार नाही. 

हे वाचा - 'काय घडलं त्या रात्री?' मालिका सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यु प्रकरणावर आधारित?

थप्‍पड़ (2020)
दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या या चित्रपटाला समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाली. तसंच तापसी पन्नूच्या कामाचंही कौतुक झालं. या चित्रपटात तापसीने वैवाहिक जीवनात आनंदी असलेल्या एका महिलेची भूमिका पार पाडली आहे. सुखाचा संसार सुरू असताना अचानक पतीने सर्वांसमोर एक थप्पड मारली आणि त्यानंतर सुरु होतो स्त्रीच्या सन्मानासाठीचा संघर्ष. हा चित्रपट पुरुष आणि स्त्री यांच्यात बरोबरीचं नातं आहे का यावर प्रश्न उपस्थित करतो.

प्रोव्होक्‍ड (2006)
घरगुती हिंसाचारावरील चित्रपटांमध्ये प्रोव्होक्ड हा चित्रपट आघाडीवर आहे. ऐश्वर्या राय, नवीन अँड्रयूज मिरांडा रिचर्ड्स, नंदीता दास यांची यामध्ये भूमिका आहे. किरनजीत अहलूवालियाच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट आहे. पतीकडून जवळपास 10 वर्षे वेगवेगळ्या प्रकारचा त्रास तिने सहन केला. शेवटी त्रासाला वैतागून त्याला मारून टाकल्याचं यात दाखवलं आहे. 

Lookback 2020: सिने इंडस्ट्रीतील 'या' कलाकारांनी २०२० मध्ये घेतला जगाचा निरोप

​मेहंदी (1998)
20 वर्षांपूर्वी आलेल्या या चित्रपटात राणी मुखर्जी (पूजा) आणि फराज खान (निरंजन) यांनी भमिका केल्या आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबातील पूजाचे पतीवर खूप प्रेम असतं. त्याच्या कुटुंबाला स्वताच्या कुटुंबासारखं मानते. मात्र जेव्हा मुलीच्या कुटुंबाकडून हुंडा मिळत नाही तेव्हा ते पूजाचा इतका छळ करतात की तिला मारण्याचा कटही रचतात. 

राजा की आएगी बारात (1997)
सूड भावना बलात्कार करण्यापर्यंत पोहोचू शकते असं राजा की आएगी बारातमध्ये दाखवण्यात आलं आहे. यात एक व्यक्ती मुलीवर फक्त एवढ्यासाठी बलात्कार करतो की तिने थप्पड लगावलेली असते. बलात्काराच्या प्रकरणावर न्यायालय असा निर्णय देते की बलात्कार करणाऱ्याने तिच्याशी लग्न करावं. यात मुलगी विचित्र परिस्थितीत अडकते. तिला मनाविरुद्ध त्या व्यक्तिसोबत रहावं लागणार आहे. तिचा संघर्ष तेव्हा सुरु होतो जेव्हा मुलाच्या घरचे तिला मारण्याचा किंवा घरातून बाहेर काढण्याचा विचार करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: domestic violence wife husband fight love movie