तिला जज करू नका, बोल्ड टीझरनंतर प्राजक्ताने शेअर केली चाहत्याची पोस्ट..

'रानबाजार' या आगामी वेब सिरिजमध्ये प्राजक्ता माळीने दिलेला बोल्ड सीन पाहून अनेकांनी तीला ट्रॉल केले आहे.
don't judge her by bold scene : prajakta mali fan post
don't judge her by bold scene : prajakta mali fan post sakal

मनोरंजन विश्वात वेब सिरीज या माध्यमाने अनेक बदल घडवून आणले. हे बदल केवळ हिंदीत नाही तर मराठीतही झाले. अनेक दमदार मराठी वेब सिरीज प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी झाल्या. एवढेच नव्हे तर प्लॅनेट मराठी (planet marathi) च्या निमित्ताने मराठी मनोरंजन विश्वाला एक स्वतंत्र ओटीटी वाहिनी मिळाली. प्लँनेट कडून सध्या दर्जेदार चित्रपट निर्मितीहि केली जात आहे. पण नुकतंच त्यांनी एका वेब सिरीजची घोषणा केली. 'रानबाजार' (raanbaazaar) असे या वेब सिरीजचे नाव असून त्याचा टिझर वाऱ्यासारखा पसरत आहे. (planet marathi news web series ranbazar) यामध्ये प्राजक्ता तेजस्विनी पंडीत (tejaswini pandit ) आणि प्राजक्ता माळीचे (prajakta mali) अत्यंत बोल्ड सीन आहेत.

don't judge her by bold scene : prajakta mali fan post
रानबाजार : १८ वर्षांखालील मुलांनी पाहू नये असा प्राजक्ता आणि तेजस्विनीचा बोल्ड सिन

याचे कारणही खास आहे. कारण या टिझरमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित (tejaswini pandit) चक्क विवस्त्र झाली आहे. (tejaswini pandit in ranbazar) तर प्राजक्ता माळीचा प्रणय प्रसंग करतानाचा सीन आहे. वेबविश्वाला हादरवून टाकणारा 'रानबाजार' अशी ओळख या वेब सिरीजची करुन देण्याच आली. पान १८ वर्षांखालील कुणीही पाहू शकणार नाहीत किंवा कुटुंबासोंबत पाहू शकणार नाहीत अशी ही दृश्ये आहेत. त्यामुळे कालपासून या टीझरवरुन बरंच ट्रोलींग सुरू झालं आहे. (prajakta mali trolls)

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्यावरी वैयक्तिक टीका होताना दिसत आहे. पण तिच्याच एका चाहत्याने एक प्राजक्ताची पाठराखण केली आहे. तो चाहता म्हणतो. 'वेब विश्वाला हादरवून टाकणारी वेब सिरिज येतीय रानबाजार. आजवर जसं प्राजक्ताच्या अनेक भूमिकांना प्रेम व प्रतिसाद दिला तसंच या भूमिकेला सुद्धा द्याल अशी अपेक्षा आहे. आणि ही वेब सिरिज बघताना कसलाही चुकीचा विचार मनात आणू नका. टीजर बघून प्रत्येकाला असं वाटलं असेल की हे चुकीच पाऊल उचललं आहे प्राजक्ताने. तर तुम्ही तिला असं जज नका करू. मुळात तुमचा बघण्याचा दृष्टीकोन बदला अशी विनंती आहे . १८ मे ला ट्रेलर येतोय नक्की पहा. आपलाच प्राजक्ताचा फॅन..' अशी पोस्ट या चाहत्याने केली आहे. ही चाहत्याची पोस्ट प्राजक्ताने आपल्या स्टोरी मध्ये शेअर केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com