आंबेडकरी विचारधारेच्या प्रचारासाठी नवीन 'OTT', या चित्रपटानं शुभारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेडकरी विचारधारेच्या प्रचारासाठी नवीन 'OTT', या चित्रपटानं शुभारंभ
आंबेडकरी विचारधारेच्या प्रचारासाठी नवीन 'OTT', या चित्रपटानं शुभारंभ

आंबेडकरी विचारधारेच्या प्रचारासाठी नवीन 'OTT', या चित्रपटानं शुभारंभ

मुंबई - देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आता एक नवीन उपक्रम सुरु होतोय. तो सध्याच्या काळात सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या ओटीटी माध्यमावरून सुरु होणार आहे. सध्या आंबेडकरी विचारधारा आणि संविधानाच्या काही घटकांवर आधारित असलेला जय भीम प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो आहे. सोशल मीडियावर त्याची चर्चा आहे. आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर अनिरुद्ध दवे अभिनित कोटा नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

'बाबा प्ले' नावाच्या डिजिटल सोशल प्लॅटफॉर्मवरुन हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या चित्रपटामध्ये एका दलित विद्यार्थ्याची कथा मांडण्यात आली आहे. त्यामध्ये उच्च जातीच्या विदयार्थ्यांकड़ून होणारा भेदभाव, शोषण हे दाखवण्यात आले आहे. कशापद्धतीनं त्याला त्रास देण्यात आले हे चित्रपटाच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा होती. आता तो प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना एक वेगळा विचार आणि अनुभव मिळाल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास निर्माते - दिग्दर्शक यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: 'दबंग गर्ल' होणार 'खान कुटूंबियांची' सून?

हेही वाचा: Movie Review; प्रेक्षकांच्या भावनेचा बाजार मांडणाऱ्या चॅनेलचा 'धमाका'

चित्रपट कोटामध्ये एक दलित विद्यार्थी आपल्यावर वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या अत्याचारामुळे त्रस्त होतो. त्याचा परिणाम म्हणून तो एक कठोर पाऊल उचलतो. तो विद्रोही होतो. हा सगळा प्रवास चित्रपटातून अधोरेखित करण्यात आला आहे. जो न्यायासाठी लढतो. केवळ मनोरंजन नव्हे तर प्रबोधन हा विचार चित्रपटातून देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक संजीव जयस्वाल यांच्या या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. संजीव यांची पहिला चित्रपट फरेब 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याचे दिग्दर्शन दीपक तिजोरीनं केलं होतं. त्यामध्ये शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी आणि मनोज बाजपेयी हे मुख्य भूमिकेत होते.

loading image
go to top