Dream Girl 2 : 'सगळं ठीक, पण अनन्याला का घेतलं?' नेटकऱ्यांची पसंती कुणाला?

ड्रीम गर्लचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चाही होत आहे.
Dream Girl 2 Teaser Out Now
Dream Girl 2 Teaser Out Nowesakal

Dream Girl 2 Teaser Out Now : आयुषमान खुराणाचा बहुचर्चित असा ड्रीम गर्ल २ चा टीझर प्रदर्शित झाला असून तो सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे. मात्र त्यात प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या ट्रोल झाली आहे. या चित्रपटामध्ये ती दिसणार म्हटल्यावर नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले आहे.

ड्रीम गर्लचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चाही होत आहे. आयुषमानच्या आगळ्या वेगळ्या भूमिकेनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यात आले आहे. यापूर्वी देखील आयुषमाननं त्याच्या परफॉर्मन्सनं स्टारपद मिळवलं. भूमिका कोणतीही असो त्यात आयुषमाननं त्याची छाप उमटवलेली दिसते. आता ड्रीम गर्लमध्ये त्यानं साकारलेली स्त्री व्यक्तिरेखा चाहत्यांच्या कुतूहलतेचा विषय आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

यापूर्वी ड्रीम गर्लच्या पहिल्या पार्टला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटानं कमाल केली होती. आताही चित्रपटाच्या टीझरवर कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. मात्र काहींनी त्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. त्याचे कारण अनन्या पांडे. आयुषमान सोबत अनन्या दिसल्यानं काहींना ती गोष्ट खटकली आहे. नेटकऱ्यांनी आम्हाला आमचे पैसे परत करा, तुम्ही त्यात अनन्याला का घेतले अशी विचारणा केली आहे.

अनन्याला घेण्यामागील कारण का, तिला कुठे अॅक्टिंग येते, असे प्रश्न विचारुन नेटकऱ्यांनी अनन्याप्रती राग व्यक्त केला आहे. अनन्याच्या यापूर्वीच्या प्रोजेक्टबद्दल सांगायचे झाल्यास तिचा यापूर्वी प्रदर्शित झालेल्या गहराईया आणि लायगर चित्रपट फ्लॉप झाला होता. त्यावरुन तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलही केले जात होते. येत्या काळात भलेही अनन्याकडे मोठमोठे प्रोजेक्ट असतीलही पण तिची भूमिका प्रेक्षकांना फारशी आवडलेली नाही.

केव्हा होणार प्रदर्शित होणार ड्रीम गर्ल?

आयुषमान खुराणाच्या नव्या चित्रपटाविषयी बोलायचे झाल्यास तो २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट २५ जुलै रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव या चित्रपटाचे रिलिज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर आणि शोभा कपूक यांनी केले असून त्याचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. त्यात आयुषमान आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Dream Girl 2 Teaser Out Now
Unaad Review : तरुणाईला 'मार्गदर्शक' ठरेल अशी कलाकृती!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com