'ड्रीम गर्ल' अभिनेत्री रिंकू सिंग निकुंभचे कोरोनानं निधन

रिंकू हॅलो चार्लीमध्ये (hello charlie) शेवटची दिसली होती. देशभर
riynku singh
riynku singhTeam esakal

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता आयुषमान खुराणाच्या ड्रीम गर्ल मध्ये काम केलेली अभिनेत्री रिंकू सिंग निकुंभ (dream girl actress ryinku singh ) चे कोरोनानं निधन झाले आहे. तिच्या निधनाचे वृत्त ऐकताच बॉलीवूडवर (bollywood) शोककळा पसरली आहे. ती गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या आजारानं त्रस्त होती. तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. त्या उपचारा दरम्यान तिचं निधन झाले आहे. आयुषमानच्या त्या चित्रपटानं बॉलीवूडमध्ये ओळख मिळवून दिली होती. (dream girl actress ryinku singh nikumbh passes away)

रिंकू हॅलो चार्लीमध्ये (hello charlie) शेवटची दिसली होती. देशभर कोरोनाचा कहर अजूनही वाढताना दिसतो आहे. बॉलीवूडमध्येही (bollywood) मोठ्या प्रमाणावर कोरोना पसरला होता. यात अनेक सेलिब्रेटींना जीव गमवावा लागला होता. कोरोनाचा गंभीर परिणाम मनोरंजन क्षेत्रावर झाला आहे. बॉलीवूडमधील अभिनेत्री रिंकू सिंगचं कोरोनानं निधन झालं आहे. व्हिसलिंग वूड़्स (whisling woods) मधून शिक्षण घेतलेल्या रिंकूनं तिच्या करिअरची सुरुवात चिडियाघर आणि बालवीर या चित्रपटातून केली होती.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंकूची बहिण चंदा सिंग निकुंभचं म्हणणं आहे की, रिंकूला 25 मे ला कोरोना झाला होता. त्यानंतर ती होम आयसोलेशनमध्ये होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तिला आयसीयुची गरज आहे याचा विचार केला नाही. ती सुरुवातीपासूनच जनरल वॉर्डमध्ये होती. तिच्यावर सुरु असणा-या उपचाराचा तिला मोठा फटका बसला असे म्हणावे लागेल.

riynku singh
'द फॅमिली मॅन २'मधील प्रियामणीचं विद्या बालन कनेक्शन माहितीये का?
riynku singh
Good News: अपारशक्ती खुराना लवकरच होणार बाबा

ज्यावेळी तिला आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हा तिच्या परिस्थितीमध्ये सुधारणा झाली होती. रिंकू ही अस्थमाची पेशंट होती हे तेव्हा समजले. शेवटी तिची प्राणज्योत मालवली. रिंकू ही प्रचंड उत्साही होती. तिला लोकांची मदत करायला आवडायचे. रुग्णालयात असताना देखील ती सतत लोकांच्या मदतीचा विचार करत असे. बरं झाल्यानंतर तिला गोव्याला एका शुटिंगच्या निमित्तानं जाणार होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com