दृश्यम 2 ची हवा झाली टाईट; निर्मात्यांनी लावला डोक्याला हात

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 21 February 2021

तमिळ रॉकर्सने हा चित्रपट लीक केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कोरोनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. 

मुंबई - डिजिटल प्लॅटफॉर्मचा जसा फायदा आहे तसा तोटाही हे आतापर्यत अनेकदा दिसून आले आहे. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर जे चित्रपट प्रदर्शित होत आहेत त्यांनाही पायरसीला सामोरे जावे लागत आहे. नवीन एखादा सिनेमा अथवा मालिका प्रदर्शित झाली तर त्याला प्रेक्षकांच्या पसंतीपेक्षा तो ऑनलाईक लीक तर होणार नाही ना याची जास्त काळजी घ्यावी लागत आहे. आता असाच एक प्रकार प्रसिध्द अशा दृश्यम 2 चित्रपटाच्या बाबतीत दिसून आले आहे. प्रख्यात अभिनेता मोहनलाल यात प्रमुख भूमिका साकारत आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच हा सिनेमा ऑनलाईन व्हायरल झाला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून तो प्रेक्षकांना पाहता येणार असल्यानं निर्माते आणि दिग्दर्शक यांची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून ऑनलाईन पायरसीचा धोका वाढलेला दिसत असताना त्यात या सिनेमाची भर पडली आहे. एकीकडे कोरोनामुळे मनोरंजन क्षेत्रापुढे मोठे आर्थिक आव्हान उभे असताना दुसरीकडे अशाप्रकारची ऑनलाईन व्हिडिओ लीक प्रॉब्लेम समोर येत असल्याने गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. दृश्यमचा पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या दुस-या भागाची उत्सुकता प्रेक्षकांना  होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Drishyam 2 (@drishyam_2)

या चित्रपटापूर्वी तमिळ रॉकर्सने अनेक चित्रपट लीक केले आहेत. यात  उप्पेना , लाहोर कॉन्फिडेंशिअल,  तांडव ,  मास्टर, क्रॅक,  लक्ष्मी, आश्रम, लुडो, रसभरी, पाताल लोक, गुलाबो सिताबो, घुमकेतू असे अनेक चित्रपट प्रदर्शनापूर्वी तसेच प्रदर्शनानंतर काही तासांत लीक झाले आहेत. त्यावर कारवाई करण्यात यावी असे या अगोदरही मागणी अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांनी केली होती. मात्र त्याचा उपयोग झाला नाही.

हेही वाचा : मिस वर्ल्डचा किताब जिंकण्यापूर्वी प्रियांकासोबत घडला धक्कादायक प्रसंग, प्रियांका म्हणाली..

  दुस-या भागात दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल आणि मीना यांची प्रमुख भूमिका असून हा सिनेमा साधारण तीन ते चार दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. ज्या दिवशी हा सिनेमा ऑनलाईन प्रदर्शित झाला त्यानंतर काही तासांतच त्याची ऑनलाईन कॉपी व्हायरल झाल्यानं चित्रपट निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे.

 हेही वाचा : प्रिया बापटलाही लागलं 'पावरी'चं याड; पाहा धमाल व्हिडीओ

तमिळ रॉकर्सने हा चित्रपट लीक केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कोरोनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते.  फेब्रुवारीच्या तिस-या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता.  प्रदर्शनानंतर काही तासांत लीक झाल्यानं मोठा प्रश्न उभा झाला आहे. सध्या हा चित्रपट टॉरंट, टेलीग्रामवर प्रदर्शित झाल्याचं पाहायला मिळते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: drishyam 2 movie online leaks on Tamil rockers websites actor Mohanlal play led role in second part