Agnihotri Beef Video: 'गोमांस खाल्लं की नाही?',अग्निहोत्रींनी केला हैराण करणारा दावा Vivek Agnihotri Beef Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vivek Agnihotri on his viral beef video, He claims,his video was edited

Agnihotri Beef Video: 'गोमांस खाल्लं की नाही?',अग्निहोत्रींनी केला हैराण करणारा दावा

Agnihotri Beef Video:अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' रिलीज होणार होता, त्यावेळी त्यावेळी रणबीर कपूरचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात तो गोमांस खाण्याविषयी बोलताना दिसत होता. त्यानं सांगितलं होतं की त्याला गोमांस खाणं खूप आवडायचं. ११ वर्षापूर्वीचा जुना व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक खूप भडकले होते. आणि नेमकं याच दरम्यान 'द काश्मिर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा एक जुना व्हिडीओ समोर आला होता,ज्यात ते देखील गोमांस खाण्याविषयी बोलताना दिसले. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर खूप मोठा वाद पेटला. लोकांनी अग्निहोत्रींना उलट-सुलट बरंच सुनावलं. आता याच वादावर विवेक अग्निहोत्रींनी आपलं मत मांडलं आहे. त्यांनी दावा केला आहे की,या व्हिडीओला एडिट केलं गेलं आहे. ते आधी गोमांस खायचे,आता खात नाहीत. त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की त्या व्हिडीओत बीफ नाही तर बफ म्हणजे बफेलो विषयी ते बोलत होते. (Vivek Agnihotri on his viral beef video, He claims, his video was edited)

हेही वाचा: Vikram Vedha विषयी हृतिकच्याच मनात चुकचुकली शंकेची पाल; म्हणाला,'माहीत नाही सिनेमा..'

विवेक अग्निहोत्री यांनी एका मुलाखतीत याविषयी भाष्य केलं आहे. जेव्हा त्यांना गोमांस खाण्यासंदर्भात वक्तव्य केलेल्या जुन्या व्हिडीओविषयी विचारलं गेलं तेव्हा ते म्हणाले,''तो व्हिडीओ एडिट केला आहे.लोक उगाचच कोणत्याही गोष्टींना छेडत वादाचा मुद्दा उखडून काढत आहेत. एका व्हिडीओ क्लिपला छेडत त्यातल्या काही गोष्टी एडिट करण्यात आल्या आहेत. त्यात मी म्हटलंय की मी गोमांस खात होतो,आता मी खात नाही. त्यांनी नेमकं मी खात नाही म्हणालो तेच एडिट केलं. त्यामुळे ते ऐकल्यावर वाटतं की मी आताही गोमांस खातो. ज्यानं कुणी केलंय,ठीक आहे, माझ्याशी कोणी खेळ खेळत असेल तर मी त्याचं उत्तर द्यायला खंबीर असतो,मला या गोष्टींनी काही फरत पडत नाही''.

हेही वाचा: Vikram Vedha: हृतिक-सैफच्या मानधनात मोठी तफावत; एकानं घेतले 50 करोड तर दुसऱ्यानं...

त्यानंतर विवेक अग्निहोत्री पुढे म्हणाले कि,''ते बीफ(गोमांस) नाही तर बफेलो(म्हैस) असं म्हणाले होते. काही असे लोक असतात,जे तुम्हाला मुळीच पसंत करत नाहीत. ते तुमचा विरोध करतात. तुम्हाला बदनाम करण्याचा त्यांचा हेतू असतो. त्यांना फक्त तुम्हाला त्रास द्यायचा असतो. पण माझ्यावर विश्वास ठेवा,या अशा लोकांपासून मला मुळीच अडचण नाही. गोमांस खाण्यासंदर्भातल्या माझ्या वक्तव्याचा जो व्हिडीओ एडिट करुन चालवला आहे,त्याच्याविषयी म्हणायचं झालं तर ते ऐकल्यावर असंच वाटतंय की खरंच मी आताही गोमांस खातो. भारतात गोमांस मिळत नाही. मी म्हटलंय ते बीफ नाही,बफेलो असा शब्द आहे''.

हेही वाचा: अग्निहोत्रींनी आता अमिताभवर घेतलं तोंडसुख, म्हणाले,'हे तर माफिया,यांनी...'

अग्निहोत्री पुढे म्हणाले,''ते शाकाहरी कुटुंबातून आहेत. माझी आई जेवणात लसूण-कांदा देखील खायची नाही. त्यामुळे इतके नियम घरात जेव्हा खाण्याविषयी असतात तेव्हा तरुण मुलं खासकरून याचा विरोध करु लागतात. मग सुरुवातीला धुम्रपान सुरू करतात,मग मद्यपान. माझ्याबाबतीत तसं झालं नाही पण एक हॉटेल होतं,जिथे माझ्या ओळखीचे सगळे जायचे,त्यामुळे मी पण अधन-मधनं तिथे डोकवायचो,तेव्हा कधीतरी बफेलोचं मांस खाल्लं आहे किंवा भारतात बाहेर प्रवास करताना खाण्यात आलंय. ते देखील बर्गरसोबत खाल्लं आहे. याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही गोमांस ऑर्डर करताय आणि ते मजेनं खात आहात''.

हेही वाचा: 'मारायचा प्लॅन आहे का?', ऐश्वर्याला चाहत्याचा सवाल

याच मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांनी रणबीर कपूरच्या गोमांस खाण्याच्या वक्तव्याचं समर्थन करताना म्हटलं की,''हा प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडीचा प्रश्न आहे''. रणबीरच्या एका जुन्या व्हिडीओमुळे त्याला टार्गेट केल्याची खंत देखील अग्निहोत्रींनी या मुलाखतीत व्यक्त केली.