esakal | सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज लपवलं, व्हिडिओ व्हायरल; मुनमुनचं नाव चर्चेत
sakal

बोलून बातमी शोधा

सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज लपवलं, व्हिडिओ व्हायरल; मुनमुनचं नाव चर्चेत

सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज लपवलं, व्हिडिओ व्हायरल; मुनमुनचं नाव चर्चेत

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - मुंबई वरुन गोव्याला जाणाऱ्या कॉर्टेलिया क्रुझवर एनसीबीनं छापा टाकला. आणि त्यातून त्यांनी मोठी कारवाई केली. त्यात बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलाला आर्यन खानला (aryan khan) अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह आणखी काही जणांनाही एनसीबीनं अटक केली आहे. त्यांचा रवानगी एनसीबीच्या कोठडीत करण्यात आली आहे. या तपासादरम्यान अनेक खळबळजनक गोष्टी समोर आल्या आहे. त्यापैकी एक म्हणजे त्या क्रुझवरील रेव्ह पार्टीमध्ये सहभागी झालेल्या मुनमुन धमेच्याकडूनही (Munmun Dhamecha) ड्रग्ज जप्त करण्यात आली आहे. तिनं क्रुझवर ड्रग्ज नेण्यासाठी सॅनिटरी पॅडचा वापर केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याबाबत एएनआयनंही व्टिट करुन माहिती दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात सध्या मुनमुनचे नाव चर्चेत आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड विश्वामध्ये क्रुझ पार्टी आणि त्यावर केलेली कारवाई यांची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यात अनेकांना अटकही करण्यात आली आहे. यात कारवाई करण्यात आलेले संशयित आरोपी हे बड्या सेलिब्रेटींची मुलं आहेत असंही सांगण्यात आलं आहे. आर्यन खानसोबत मुनमुनलाही अटक करण्यात आली आहे. त्या केसशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे. एका नेटकऱ्यानं तो व्हिडिओ शेयर केला आहे. एएनआयनं देखील एक व्टिट व्हायरल करत त्यात आपल्याला एका महिलेकडून ड्रग्ज सापडल्याची माहिती दिली आहे. याप्रकरणी एनसीबी पुढील तपास करत आहे. त्या व्हिडिओमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, त्या सॅनिटरी पॅडमधून एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ड्रग्ज जप्त केले आहे.

या व्हिडिओविषयी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीनं मुनमुनच्या रुममधून ते पॅड जप्त केले आहे. 28 सेकंदाच्या त्या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे ते ड्रग्ज जप्त करण्यात आले हे दाखवण्यात आले आहे. सॅनिटरी पॅडमध्ये एका कागदामध्ये ते ड्रग्ज आढळून आले आहे. सध्या मुनमुन ही एनसीबीच्या कोठडीत आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मुनमुन ही एक मॉडेल आहे. आणि ती एका बिझनेस फॅमिलीशी संबंधित आहे. गेल्या काही काळापासून ती दिल्लीमध्ये राहत असून तिच्या सोशल मीडियावरही त्या पार्टीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा: आर्यन खान प्रकरणावर रवीनाची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली...

हेही वाचा: NCB : ड्रग्स विक्रेता ताब्यात; आर्यन खानशी संबंध?

loading image
go to top