कोरोनामुळे बॉलीवूडला ३५०० कोटींची चपराक 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 December 2020

कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. यात प्रामुख्याने बॉलीवूडलाही प्रचंड आर्थिक झळ सोसावी लागली आहे. कोरोनाचा प्रभावच एवढा प्रचंड होता की त्यापुढे बॉलीवूडचा कुठलाही किंग खान, भाईजानचा जलवा चालला नाही. सगळ्यांना नुकसान आणि तोट्याला सामोरे जावे लागले.

मुंबई - कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. यात प्रामुख्याने बॉलीवूडलाही प्रचंड आर्थिक झळ सोसावी लागली आहे. कोरोनाचा प्रभावच एवढा प्रचंड होता की त्यापुढे बॉलीवूडचा कुठलाही किंग खान, भाईजानचा जलवा चालला नाही. सगळ्यांना नुकसान आणि तोट्याला सामोरे जावे लागले. 

कोरोनाच्या महामारीमुळे बॉलीवूडला तब्बल ३५०० कोटींची झळ सोसावी लागली आहे, त्यामुळे मोठे निर्माते आणि दिग्दर्शक अडचणीत सापडले आहे. दरवर्षी भारतात प्रदर्शित होणा-या चित्रपटांची संख्या ही ४०० पेक्षा जास्त आहे. यात सर्व भाषा, राज्ये यांचा समावेश करण्यात आहे. मात्र यंदाचे वर्ष कोरोनाचे असल्यानं त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांना सोसावा लागला आहे. यात बॉलीवूडचाही समावेश करावा लागेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अद्याप चित्रपट घरांमध्ये प्रेक्षकांनी जाण्यास सुरुवात केलेली नाही. कोरोनाचा वाढणारा धोका लक्षात घेता अनेकजण चित्रपटगृहात जाण्यास टाळाटाळ करताना दिसून येतात. गेल्या काही दिवसांपूर्वी शासनानं चित्रपटगृहांना ते उघडण्याची परवानगी दिली असली तरी प्रत्यक्षात प्रदर्शित होणा-या चित्रपटांची संख्या अत्यल्प आहे. त्यात प्रेक्षक सहजासहजी सिनेमागृहात जाण्यास तयार होताना दिसत नाही. दरवर्षी बॉलीवूडचे चित्रपट मोठ्या प्रमाणात व्यवसाय करतात.

'सिर्फ इंन्सान गलत नही होते, वक्त भी गलत हो सकता है' 

२०२० मध्ये सुरुवातीला अजय देवगण याचा तानाजी द अनसंग वॉरियर नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या सिनेमाला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. वर्षाची सुरुवात तर चांगली झाली होती. मात्र पुढे आलेल्या कोरोनासारख्या जीवघेण्या आजारानं अवघड परिस्थिती निर्माण केली. त्यामुळे सर्वांवर आर्थिक संकट कोसळले. चालु वर्षी अक्षय कुमारचा सूर्यवंशी, रणवीर सिंगचा ८३, वरुण धवनचा कुली नं १, सलमान खानचा राधे हे चित्रपट प्रदर्शित होणार होते. ते काही कारणास्तव लांबणीवर पडले.

काँग्रेस म्हणे, कंगणाला चौकशीसाठी बोलवा' 

बागी ३ या चित्रपटानंतर थिएटर बंद झाले होते. याशिवाय जॉन अब्राहमचा सत्यमेव जयते २, अजय देवगणचा भूज द प्राईड ऑफ इंडिया, मैदान, रणवीर आणि अलियाचा ब्रम्हास्त्र हे चित्रपट अद्याप प्रदर्शित होणे बाकी होते, ते आता लांबणीवर पडले आहेत. अमीर खानचा लाल सिंग चढ्ढा हे चित्रपट आता पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to pandemic situation bollywood loss 3500 core rupeess business