काँग्रेस म्हणे, कंगणाला चौकशीसाठी बोलवा' 

टीम ईसकाळ
Wednesday, 30 December 2020

कोणताही विषय टीका करण्यासाठी कंगणाला वर्ज्य नाही. मागील अनेक दिवसांपासून ती वेगवेगळ्या विषयांवर सोशल मीडियावर करत असलेली वक्तव्ये यामुळे तिच्याविषयी एकप्रकारचा नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. 

मुंबई - कंगणाच्या मागे लागलेले वादाचे शुक्लकाष्ठ काही सुटण्याचे नाव घेत नाही. ती कायम वेगवेगळ्या वादांमध्ये अडकल्याचे दिसून आले आहे. कोणताही विषय टीका करण्यासाठी कंगणाला वर्ज्य नाही. मागील अनेक दिवसांपासून ती वेगवेगळ्या विषयांवर सोशल मीडियावर करत असलेली वक्तव्ये यामुळे तिच्याविषयी एकप्रकारचा नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. 

आताही कंगणावर काँग्रेसनं टीका केली आहे. त्यात तिला एनसीबी चौकशीसाठी कधी बोलवणार असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. शेतकरी आंदोलनावर केलेली टीका, अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांज याच्याशी झालेला वाद, सुशांत सिंग राजपूत प्रकरणात परिस्थितीला वेगळे वळण देण्यास प्रवृत्त केलेली विधाने, मुख्यमंत्री व काही महत्वाच्या राजकीय व्यक्तींवर केलेली टीका यामुळे तिला अनेकांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. 

हेही वाचा : बाप मुलाच्या नात्यात विसंवाद असल्यानं आमच्यात होतात 'वाद'

कंगना राणावत मुंबईत आल्यानंतर काँग्रेसनं एनसीबीला एनसीबीला प्रश्न विचारत चौकशी करावी अशी मागणी केली आहे. ड्रग्जच्या आहारी गेल्याची कबूली देतानाचा कंगनाचा व्हिडीओही काँग्रेसनं ट्विट केला आहे. मंगळवारी मुंबईत आली. कंगणा मुंबईत आल्यानंतर तिची चौकशी करायची असे केंद्रीय प्रशासनाच्या एनसीबीकडून सांगण्यात आले होते. आता त्याची आठवण काँग्रेसनं करुन दिली आहे.

मुंबईत दाखल झाल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्विट करत ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करत असलेल्या एनसीबीला सवाल करणार ट्विट केलं आहे. ‘आपण ड्रग्जच्या आहारी गेलो होतो,’ अशी कबूली देणारा कंगनाचा व्हिडीओ ट्विट करत भाजपालाही लक्ष्य केलं. आहे.

ट्विंकलच्या वाढदिवशी अक्षयची 'खास' रोमँटिक पोस्ट

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर राज्यात ड्रग्ज सेवनाचा मुद्दा समोर आला होता. त्यातून राजकीय वादविवाद झाला. त्यानिमित्तानं पुन्हा काही नवे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. सावंत यांनी असे म्हटले आहे की, “डिअर एनसीबी, ती परत आलीये. या व्हिडीओच्या चौकशीसाठी तुम्ही कंगनाला कधी चौकशीसाठी बोलवणार आहात? कंगनाला बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटची माहिती द्यायची असल्यानं मोदी सरकारने तिला वाय श्रेणीची सुरक्षा दिली आहे. मात्र, ती अजूनही माहिती लपवत आहे, जो की गुन्हा आहे,” असं सावंत यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा : 'कुणाला काही प्रॉब्लेम असल्यास मला अनफॉलो करा'

एनसीबीला माहिती देण्याची विनंती राम कदम आता कंगनाकडे करतील का? महाराष्ट्राची बदनामी केल्याबद्दल भाजपा माफी मागणार का?,” असा सवालही सचिन सावंत यांनी केला आहे. कंगणाच्या समर्थनार्थ भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपाने तिला (कंगणा) झांशीची राणी असून महाविकास आघाडी सरकार तिला ही माहिती पोलिसांना देऊ देत नाही, असा आरोपही केला आहे.

फॅमिली मॅन 2 चे पोस्टर व्हायरल, प्रेक्षकांची उत्सुकता वाढली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress demand to ncb take action against actress kangana ranaut