'सिर्फ इंन्सान गलत नही होते, वक्त भी गलत हो सकता है' 

'सिर्फ इंन्सान गलत नही होते, वक्त भी गलत हो सकता है' 

मुंबई - जगावं असं की आपण गेल्यानंतर आपल्या आठवणीनं सारं जग गलबलून जावं. असं म्हटलं जात. सरत्या वर्षाला निरोप देताना या वर्षी ज्यांनी सर्वांचा निरोप घेतला त्या कलाकारांच्या जाण्यानं कलेच्या क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी न भरणारी आहे. प्रेक्षकांचे अखंडपणे मनोरंजन करुन त्यांना निखळ आनंद देणा-या त्या महान कलावंतांचं जाणं सहजासहजी विसरता येण्यासारखे नाही. 

बॉलीवूडनं या वर्षी १४ कलावंतांना निरोप दिला. यातील काही कलावंत हे दुर्धर आजारानं गेले तर काही कोरोनासारख्या जीवघेण्या रोगानं. त्यामुळे सारं बॉलीवूड हळहळलं. शोकसागरात बुडाले. परिस्थिती इतकी बिकट होती की या सा-या कलावंतांना निरोप देतानाही कोविडच्या नियमांचे पालन करावे लागले. अशा काही अभिनेते, दिग्दर्शक, लेखक, निर्माते यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा.

१.  इरफान खान (irrfan khan) - आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा प्रसिध्द अभिनेता म्हणजे इरफान खान. एका वेगळ्या ताकदीचा आणि उंचीचा अभिनेता म्हणून त्याचे नाव घ्यावे लागेल. असे म्हटले जाते की, बॉलीवूडमध्ये यायचे झाल्यास कुणा गॉडफादरची गरज लागते. इरफान खान मात्र त्याला अपवाद होता. हे बिनदिक्कतपणे सांगावे लागेल. २९ एप्रिल रोजी ५३ वर्षाच्या या अभिनेत्यानं अखेरचा श्वास घेतला. त्याला कॅन्सरसारखा दुर्धर आजार झाला होता. 

 २. ऋषी कपूर (Rishi Kapoor)-  लुकेमिया आजाराशी दोन हात करण्यात ऋषी कपूर यांना अपयश आले. ३० एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. दोन वर्ष त्यांनी त्या आजाराचा मोठया हिंमतीनं मुकाबला केला. सुपरस्टार म्हणून ओळख असणा-या ऋषी कपूर यांच्या जाण्यानं बॉलीवूडला मोठा धक्का बसला होता. १९७० साली आपल्या करिअरला सुरुवात करणा-या ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट २०१९ मध्ये आला होता.

३. सुशांतसिंग राजपूत (Sushant Singh Rajput) - ज्याच्या आत्महत्येनं सार बॉलीवूड सुन्न झालं अशा सुशांतसिंगचं जाणं मनाला चटका लावणारे होते. आपल्या राहत्या घरी सुशांतसिंगने आपला आत्महत्या केली होती. त्याचे गुढ उलगण्याचे काम अदयाप पोलीस करत आहे. 

४. बासु चॅटर्जी (Basu Chatterjee) - चित्रपट क्षेत्रातील एक मानाचं नाव म्हणून बासु चॅटर्जी यांचे नाव घ्यावे लागेल. चित्रपट निर्माते आणि पटकथा लेखक म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. ४ जून रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता, ब्योमकेश बक्क्षी या मालिकेचे निर्माते म्हणूनही त्यांची ओळख होती. 

ट्विंकलच्या वाढदिवशी अक्षयची 'खास' रोमँटिक पोस्ट

५. जगदीप (Jagdeep) - विनोदी अभिनेता म्हणून परिचित असणारे जगदीप यांची शोले चित्रपटातील सुरमा भोपाली नावाची भूमिका चांगलीच गाजली होती. त्यामुळे त्यांना एक प्रसिध्द विनोदी अभिनेता म्हणून ओळख मिळाली होती. त्यांचं खरं नाव सय्यद इश्तिआक अहमद जाफरी हे त्यांचे खरे नाव होते. ८ जून रोजी त्यांचे निधन झाले. 

६. इब्राहिम अल्काझी (Ebrahim Alkazi) - भारतीय नाट्यसृष्टीतील एक मानाचे नाव म्हणजे इब्राहिम अल्काझी हे होय. सातत्यानं वेगवेगळे प्रयोग करणारे कलावंत म्हणून त्यांनी भारतीय रंगभूमीला दिलेलं योगदान असाधारण आहे. त्यांनी ५० हून अधिक नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. एनएसडीचे पहिले संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. 

७. निशिकांत कामत (Nishikant Kamat) - दृश्यम आणि मदारी या चित्रपटांचे दिग्दर्शक अशी निशिकांत कामत यांची ओळख होती. १७ ऑगस्ट रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ५० वर्षांच्या कामत यांनी २००५ मध्ये डोंबिवली फास्ट पासून दिग्दर्शनाला सुरुवात केली होती. 

८. सौमित्र चॅटर्जी (Soumitra Chatterjee)- महान बंगाली अभिनेता म्हणून सौमित्र चॅटर्जी यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांनी नोव्हेंबर १५ ला एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. प्रतिभावान दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या अपु ट्रायालॉजीमध्ये त्यांनी केलेला अभिनय सर्वांच्या पसंतीस पडला होता. 

९. आसिफ बसरा (Asif Basra) - या अभिनेत्यानं आत्महत्या का केली याचा शोध पोलीस घेत आहे. एका वेगळ्या विचारांचा आणि परंपरेचा अभिनेता म्हणून आसिफ बसरा यांचे नाव घेतले जाते. १२ नोव्हेंबर रोजी धर्मशाला येथे त्यांनी आत्महत्या केली होती. जब वी मेट, काय पो चे, पाताललोक, वन्स अपॉन टाईम इन मुंबई यात त्यांनी अभिनय केला होता. 

फॅमिली मॅन 2 चे पोस्टर व्हायरल, प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

१०. एस पी बालसुब्रमण्यम (S. P. Balasubrahmanyam) - आपल्या जादुई आवाजानं सर्वांना भारावून टाकणारे गायक एस पी बालसुब्रमण्यम यांचे जाणे मनाला चट़का लावणारे होते. कोरोनामुळे त्यांना मृत्युला सामोरे जावे लागले. एस पी म्हणून सर्वज्ञात असणा-या या गायकाने ४० हजाराहून अधिक गाणी गायली होती. 

११. भानु अथ्थैया ( Bhanu Aththaya)- भारताला ऑस्कर मिळवून देणारे कलाकार म्हणून भानु अथैय्या यांच्याकडे पाहिले जाते. ९१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. पाच दशकांहून अधिक काळ काम करणा-या अथैय्या यांनी १०० हुन अधिक चित्रपटांमध्ये वेशभूषाकार म्हणून काम पाहिले. 

१२. सरोज खान (Saroj Khan) -  प्रसिध्द कोरिओग्राफर सरोज खान यांचे जाणे मनाला चटका लावणारे होते. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांचे कार्डिअॅक अॅटॅकनं त्यांचं निधन झालं. तीन वेळा त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१३. वाजिद खान (Wajid Khan) - दबंग चित्रपटाचे संगीतकार वाजिद खान यांची एक्झिट हेलावून टाकणारी होती. हद्यविकाराच्या झटक्यानं त्यांचे निधन झाले. ते काही दिवस कोरोनाच्या आजारानं त्रस्त होते. 

१४.  आर्या बॅनर्जी (Arya Banerjee) - द डर्टी पिक्चर मधून पदार्पण करणा-या आर्या बॅनर्जी हिचा तिच्या घरी संशयास्पद मृत्यु झाला होता. १२ डिसेंबर रोजी ती कोलकात्यातील तिच्या घरी मृतावस्थेत आढळली होती. ३३ व्या वर्षी तिनं आत्महत्या केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com