"मलाही आई व्हायचयं.. तुझ्यासारखं..!" अंकिता लोखंडेने शेअर केली भावनिक पोस्ट

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 7 September 2020

पवित्र रिश्ता या मालिकेपासून दोघांच्या प्रेमाचे सुत जुळलेल्या सुशांतची एक्स गर्लफ्रेंड म्हणजेच अंकिता लोखंडे हिला देखील सुशांतच्या मृत्यूने धक्का बसला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांसह अंकिताही सीबीआय तपासाची मागणी करीत आहे. अंकिता लोखंडे सोशल मीडियावर बरीच सक्रिय असून सोशल मीडियावर कुटुंबीय व मित्र-मैत्रिणींसोबतचे फोटो शेअर करते. पण अशात तिने एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे ज्यात ती म्हणते..

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सुशांतच्या मृत्यूचे रहस्य लवकरात लवकर उलघडावं आणि त्याला न्याय मिळावा यासाठी त्याचे चाहते आस धरून बसले आहेत.

मला देखील आई व्हायचय..तुझ्यासारखं

पवित्र रिश्ता या मालिकेपासून दोघांच्या प्रेमाचे सुत जुळलेल्या सुशांतची एक्स गर्लफ्रेंड म्हणजेच अंकिता लोखंडे हिला देखील सुशांतच्या मृत्यूने धक्का बसला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांसह अंकिताही सीबीआय तपासाची मागणी करीत आहे. अंकिता लोखंडे सोशल मीडियावर बरीच सक्रिय असून सोशल मीडियावर कुटुंबीय व मित्र-मैत्रिणींसोबतचे फोटो शेअर करते. पण अशात तिने एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे ज्यात ती म्हणते...मला देखील आई व्हायचय..तुझ्यासारखं...ही पोस्ट नेमकी कोणासाठी आहे आणि का? वाचा सविस्तर...

 

हेही वाचा >  ब्रेकिंग : रस्त्यावर प्रसुती झालेल्या बाळंतीण महिलेवर डॉक्टरचा दबाव; "महिला रुग्ण व डॉक्टर" मधील वादग्रस्त संभाषणाचा VIDEO व्हायरल

टिचर्स डे निमित्त शेअर केली पोस्ट

अंकिता लोखंडेने ती सोशल मीडियावर कुटुंबीय व मित्र-मैत्रिणींसोबतचे फोटो शेअर करते. आताच अंकिताने आपल्या आईसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. अंकिताने आईसोबत एक छानसा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना तिने लिहिले आहे की - मी सर्वप्रथम आणि नेहमीच फेव्हरेट टीचर..तुला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आई...मी माझ्या मुलांसाठीही तुझ्यासारखं होऊ इच्छिते..लव्ह यू आई..अंकिताने टीचर्स डेच्या निमित्ताने आईसाठी ही खास पोस्ट केली आहे. अंकिताची ही पोस्ट फॅन्सना खूप आवडली आहे.

हेही वाचा > गोणीतून चिमुरड्याचा आवाज येताच ते थबकले...अमानवीय घटनेने नागरिकांत संताप

संपादन - ज्योती देवरे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An emotional post shared by Ankita Lokhande marathi news