Shah Rukh Khan Pathaan : जगातल्या 50 श्रेष्ठ अभिनेत्यांमध्ये शाहरुखचा समावेश; पठाण वादानंतर...

Pathaan Shah Rukh Khan
Pathaan Shah Rukh Khan esakal

मुंबईः मागील ३५ वर्षे बॉलिवूडचा अनभिषिक्त सम्राट असलेल्या शाहरुख खानच्या यशामध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. जगातल्या सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांच्या यादीत शाहरुख खानचा समावेश झालेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा 'पठाण' तुफान चर्चेत आहे. त्याचे कारण दीपिकाने परिधान केलेली बिकीनी. यामुळे शाहरुखचा 'पठाण' काही राज्यांमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली आहे.

हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

दीपिकानं परिधान केलेली बिकीनी ही भलतीच व्हायरल झाली आहे. त्या बिकीनीचा असलेला भगवा रंग याला आता राजकीय, धार्मिक रंग चढत असल्याचे दिसून आले आहे. काही ठराविक पक्षाच्या नेत्यांनी तर पठाण काही झालं तरी प्रदर्शित होऊ देणार नाही. अशी भूमिका घेतली आहे. दुसरीकडे शाहरुखनं लोकांनी आता सोशल मीडियाच्या आधारे आपला दृष्टीकोन ठरवू नये. ती सवय महागात पडणारी आहे, असे म्हटले आहे.

Pathaan Shah Rukh Khan
Uddhav Thackeray : राजा तू चुकतोस... उद्धव ठाकरेंनी कुणाला दिली समज?

सुप्रसिद्ध मॅगझिन एम्पायरने जगातल्या ५० अभिनेत्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये भारतातल्या केवळ शाहरुख खानचा समावेश आहे. या यादीमध्ये हॉलिवूडच्या टॉम हँक्स, मर्लिन मुनरो आणि केट विंसलेटसह अनेक कलाकारांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com