Faisal Khan: बिग बॉसचं घर नकोच! आमिरच्या घरात झालोय कैदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Faisal Khan

Faisal Khan: बिग बॉसचं घर नकोच! आमिरच्या घरात झालोय कैदी

Faisal Khan Interview: बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा त्याच्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे सतत चर्चेत असतो. आमिरचा लाल सिंग चढ्ढा हा आपटल्यानं तो सध्या प्रसिद्धी झोतापासून लांब असल्याचे सांगण्यात येत आहे. (Aamir Khan News) आमिरला प्रेक्षकांकडून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या धक्क्याला सामोरं जावं लागलं आहे. त्याच्या लाल सिंग चढ्ढाकडून प्रेक्षकांना (Bollywood Movies) खूप अपेक्षा होत्या. अर्थात अनेकांनी आमिरच्या हटक्या अभिनयाचे कौतूकही केले. त्याच्या मेहनतीला दादही दिली. मात्र आमिरला जे यश अपेक्षित होते ते काही त्याला मिळालं नाही.

आमिर आणि त्याचा भाऊ फैझल खान यांच्यातील वाद हा काही नवीन नाही. फैझलनं यापूर्वी देखील आमिरनं आपल्याला कशाप्रकारे मानसिक रुग्ण ठरवल्याच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. आक्रमक स्वभावाच्या फैझलनं आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं असून त्यात आमिरनं खूप बिकट परिस्थिती निर्माण केल्याचे म्हटले आहे. आता तर आपल्याला त्याच्याच घरात बंदिस्त म्हणून राहावं लागत असल्याचे फैझलनं म्हटले आहे. फैझलला त्याच्या आयुष्यावर एका वेबसीरिजची निर्मिती करायची आहे.

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानशी चांगली ओळख असताना देखील फैझलला बिग बॉसमध्ये सहभागी होण्यात काही रस नसल्याचे दिसून आले आहे. मी आमिरच्या घरात कैद झालो आहे. तेव्हा मला आणखी कोणत्या घरात जायचे नाही असे फैझलनं म्हटले आहे. एका मुलाखतीमध्ये त्यानं आपले परिवार, लग्न या गोष्टींविषयी खुलासा केला आहे. मला माझं स्वातंत्र्य हे प्रिय आहे. त्यामुळे मी काही बिग बॉसमध्ये जाणार नाही. आता आमिरच्या घरात अडकल्यानं मला कुठेही जाता येत नाही.

हेही वाचा: SS Rajamouli: इंग्रजांना 'व्हिलन' दाखवलं, राजामौली गोत्यात! सापडले वादात

मला केवळ बिग बॉसच्या घरात पैसा मिळतो म्हणून तिथे जायचे नाही. त्यातील वातावरण हे काही मला सुट होणारे नाही. त्यामुळे आणखी स्वताला मानसिक त्रास करुन घेण्यापेक्षा मी आहे त्याठिकाणी सुरक्षित आहे. अशी प्रतिक्रिया फैझलनं दिली आहे. कुठेही कैद होण्यात काही मजा नाही. आमिरच्या घरात कैद आहेच की. स्वातंत्र्याची गंमत ही वेगळीच असते. आमिरच्या लाल सिंग चढ्ढावर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे फैझल हा चर्चेत आला होता. आपल्याला माफी मागितली पाहिजे. असे सांगण्यात आले होते. पण मी माफी मागणार तोवर चित्रपट प्रदर्शित झाला होता. असे त्यानं सांगितले.

हेही वाचा: Emraan Hashmi: इम्रान हाश्मीवर दगडफेक, पहलगाममधील धक्कादायक प्रकार

Web Title: Faisal Khan Bollywood Actor Aamir Khan Brother Bigg Boss Entry Comment Not Interested

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..