esakal | ज्येष्ठ अभिनेते सौमित्र चटर्जी कालवश
sakal

बोलून बातमी शोधा

saumitra chatterji corona

दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या चॅटर्ची मागील काही दिवसांपासून आजारीच होते. कोलकाता येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर म्हणाले, आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न केले मात्र त्याला काही यश आले नाही.

ज्येष्ठ अभिनेते सौमित्र चटर्जी कालवश

sakal_logo
By
युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - आपल्या भारावून टाकणा-या अभिनय़ाच्या शैलींमुळे केवळ बंगाली रसिकांना नव्हे तर सर्व भाषिक प्रेक्षकांना आपलेसं करणा-या सौमित्र चॅटर्जी यांचे आजारपणामुळे निधन झाले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. 85 वर्षांचे असणा-या सौमित्र यांना लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आले होते.

दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या चॅटर्ची मागील काही दिवसांपासून आजारीच होते. कोलकाता येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर म्हणाले, आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न केले मात्र त्याला काही यश आले नाही. त्यांच्या फिजियोलॉजिकल सिस्टम कडून कुठलाच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे पहिल्यापेक्षा त्यांची प्रकृती वेगाने बिघडत चालली होती. त्यांना सर्व प्रकारच्या सुविधाही देण्यात आल्या परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.

डॉक्टरांनी सांगितल्यानुसार त्य़ांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना श्वासोश्वास घ्यायला त्रास जाणवत होता. त्यामुळे मागील 40 दिवसांपासून त्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. त्यात त्यांचं मूत्रपिंडही निकामी झालं होतं. डॉक्टरांनी त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवलं होतं.  अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. सौमित्र चटर्जी यांना चित्रपटसृष्टीतील आपल्या योगदानासाठी २००४ साली पद्मभूषण तर २०१२ साली दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. 

पुरुष कलाकारांना 'हिरो' बनवायचं तर आम्हाला 'चेटकीण'

पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरात सौमित्र चटर्जी यांचा जन्म १९ जानेवारी १९३५ रोजी झाला होता. प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक सत्यजीत रे यांचे ते आवडते अभिनेते म्हणून सौमित्र यांची खास ओळख होती. त्यांच्याच 'अपुर संसार' या सिनेमातून सौमित्र यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

हे ही वाचा: इरा खानने आई-वडिलांसह किरण रावकडे केला होता नैराश्याबाबत खुलासा, असा मिळाला सल्ला..

चॅटर्जी यांना 'पद्मभूषण' आणि 'दादासाहेब फाळके पुरस्कार' याशिवाय विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.  अभिजान, चारुलता, अरण्यर दिन रात्री, आशानी संकेत, सोनर केल्ला, जोई बाबा फेलुनाथ, हिरक राजेर देशे, घारे बैरे अशा अनेक सिनेमांतील त्यांच्या भूमिका गाजल्या.