प्रसिद्ध नृत्यांगना आणि दूरदर्शनच्या निवेदिका Sheeba Shyamaprasad यांचं निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sheeba shyamaprasad, sheeba shyamaprasad passed away

प्रसिद्ध नृत्यांगना आणि दूरदर्शनच्या निवेदिका Sheeba Shyamaprasad यांचं निधन

Sheeba Shyamaprasad Passed Away News: प्रसिद्ध नृत्यांगना आणि दूरदर्शनच्या निवेदिका शीबा श्यामाप्रसाद यांचे मंगळवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ५९ वर्षांच्या होत्या.

शिबा यांचे पती श्यामाप्रसाद हे सुप्रसिद्ध दिग्दर्शक होते. मंगळवार रात्री साडेदहा वाजता किम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिबा यांना झालेल्या कॅन्सरवर उपचार सुरू होते.

(Famous dancer and Doordarshan presenter Sheeba Shyamaprasad passed away)

शिबा कॅन्सरमुळे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्या पश्चात पती आणि मुले विष्णू आणि शिवकामी असा परिवार आहे.

शिबा यांनी काही चित्रपटांसाठी डबिंगही केले आहे.शीबा एक सुप्रसिद्ध नृत्यांगना होत्या.

याशिवाय शिबा यांनी सुरुवातीच्या काळात त्यांनी दूरदर्शनवर निवेदिका म्हणून काम केलंय. याशिवाय त्या SBI बँकेच्या अधिकारी होत्या. दूरदर्शनवर त्यांनी सुरुवातीला उद्घोषक आणि आशय निर्मात्या म्हणून काम केले होते.

दूरदर्शनवर निवेदक म्हणून काम करत असतानाच त्या श्यामाप्रसादांना भेटल्या आणि पुढे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दूरदर्शनवर ‘मेलपीली’ आणि जीवन टीव्हीवर ‘घेपा कार्यम’ हे लोकप्रिय कार्यक्रम सादर केले.

बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिबा यांच्या निधनाने एक उत्कृष्ट निवेदिका आणि डान्सर आपल्याला सोडून गेलीय अशा भावना सर्व स्तरांमधून व्यक्त होत आहेत.