esakal | 'फँड्री'मधल्या 'शालू'ला कोरोना; म्हणाली, ‘आशिर्वाद आणि प्रार्थना सोबत असू द्या’

बोलून बातमी शोधा

Rajeshwari kharat

'फँड्री'मधल्या 'शालू'ला कोरोना; म्हणाली, ‘आशिर्वाद आणि प्रार्थना सोबत असू द्या’

sakal_logo
By
टीम ई सकाळ

'फँड्री' चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी शालू म्हणजेच राजेश्वरी खरात हिला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना चाचणी करतानाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ‘मित्रांनो, नुकताच माझा कोव्हिड १९ चा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. तरी जे कोणी माझ्या संपर्कात आले होते त्या सर्वांनी आपली आणि आपल्या परिवाराची चाचणी करून घ्यावी, अशी विनंती. सध्या आवश्यक उपचार घेत मी होम क्वारंटाइन झाले आहे. आपल्या सर्वांचा आशिर्वाद आणि प्रार्थना सोबत असूद्यात.’

राजेश्वरीला कोरोनाची लागण झाली आहे हे या पोस्टवरून कळताच तिच्या चाहत्यांनी व्हिडीओला कमेंट करून तिला काळजी घेण्यास सांगितले. राजेश्वरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिच्या डान्सचे व्हिडीओ आणि फोटोशूटचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या या फोटो आणि व्हिडीओला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो. तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

हेही वाचा : 'इतिहासात आपल्या पिढीची नोंद ही..'; निर्बंधांचं पालन न करणाऱ्यांना सुबोधने फटकारलं

राजेश्वरीच्याच्या प्रत्येक पोस्टवर कमेंटचा पाऊस पडतो. यामुळे शालूवर अनेक नेटकऱ्यांनी मीम्स तयार केले हेत. एका सोशल मिडिया पेजने काही दिवसांपूर्वी शालूच्या पोस्टला येणाऱ्या भरघोस कमेंट्सवर एक मीम तयार केला आणि ते प्रचंड व्हायरल झाले होते.