Viral Video: 'कितना फोटो निकालोगे' म्हणत चाहत्यांवर भडकली मलायका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fan's are disappointed by Malaika Arora's rude behaviour

'कितना फोटो निकालोगे' म्हणत चाहत्यांवर भडकली मलायका

बॉलीवूडची फिटनेस क्वीन मलाईका अरोरा तिच्या अनेक गोष्टींसाठी चर्चेत असणारी अभिनेत्री आहे.पन्नाशीत पोहोचल्या नंतरही मलाईकाचं सौंदर्य तेवढंच निखळ दिसतं.तिच्या वयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात काय चाललंय हा काय कायम चर्चेचा विषय असतो.(Malaika Arora)मलाईकाची फॅन फॉलविंगही फार मोठी आहे.मलाईका दिसली कि तिच्या भोवती लगेच सेल्फी घेण्यासाठी लोकांची गर्दी जमते.असाच एक चाहता मलाईकासोबत सेल्फी घेण्यासाठी गेला असता मलाईका त्याला जे बोलली त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

हा किस्सा जिम बाहेच्या परिसरात घडला.'सेक्रेड गेम्स' या वेब सिरीजमुळे लाईम लाईट मध्ये आलेली कुब्रा सैतची जिमच्या बाहेर मलाईकाशी भेट झाली.त्या नंतर या दोघींच्या गप्पा सुरु झाल्यात.तितक्यातच एक व्यक्ती येऊन मलाईकाला सेल्फीसाठी विचारू लागला.अनेकदा हसत सेल्फी देणारी मलाईका मात्र या वेळी या व्यक्तीवर भडकली.'भाई कितना फोटो लोगे', असं म्हणत ती चाहत्यावर भडकली.तिच्या या बोलण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय.मलाईकाच्या या वागण्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वायरल झालेल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये नेटकऱ्यांनी कमेंट करत टीका केली आहे.एकाने ' हे अतिशय असभ्य वर्तन होतं' असही म्हटलं आहे.तर एकाने,'मलाईकाला खूप गर्व आहे' म्हणत तिच्यावर टीका केली आहे.तर दुसऱ्या बाजूला सेल्फी घेणाऱ्या चाहत्यावरही नेटकाऱ्याने टीका केली आहे.मलाईकाला अनेकदा तिच्या आणि अर्जुनच्या नात्यामुळेही सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागतं.(Arjun Kapoor)मलाईका आणि अर्जुन कपूर गेल्या चार वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. मलाईकाचे वय ४८ वर्षे तर अर्जुनाचे वय ३६ वर्षे आहे.या दोघांच्या वयातील अंतरावरूनही अनेकदा मलाईकाला सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागतं.

Web Title: Fans Disappointed By Malaika Aroras Rude Behaviour Her Video Viral On Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top