esakal | फरहानचा 'फॅट टू फिट' ट्रान्सफॉर्मेशन लूक व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

farhan akhtar

फरहानचा 'फॅट टू फिट' ट्रान्सफॉर्मेशन लूक व्हायरल

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरचा (farhan akhtar) तूफान (toofan) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटामध्ये फरहाननं एका बॉक्सरची भूमिका साकारली आहे. बॉक्सर अझीझ अली यांच्या जीवनावर या चित्रपटाचे कथानक आधारित आहे. फरहानने या चित्रपटासाठी फिटनेसची विशेष काळजी घेतली होती. नुकताच त्याने 'फॅट टू फिट ' अशा ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (farhan akhtar shares pics of his 3 looks in toofaan pvk99)

फरहानने हा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहीले, 'बॉक्सर अझीझच्या वेगवेगळ्या साइजमधील हे फोटो आहेत. हा प्रवास खुप प्रेरणादायी होता. 18 महिने मी खूप वर्कआऊट केला. मी माझे वजन वाढवले आणि पुन्हा कमी केले'. फरहानच्या या फोटोमध्ये त्याचे वजन देखील लिहीले आहे. फोटोमध्ये दिसत आहे की, सुरूवातीला फरहानचे वजन 69 किलो हेते. त्यानंतर 85 झाले. नंतर फरहानने वजन पुन्हा कमी करून 77 किलो केले. फोटोमधील त्याच्या अ‍ॅब्सने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. फराहनच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत. फरहानच्या या फोटोला सिद्धार्थ चतुर्वेदी, ह्रतिक रोशन, अनुषा दांडेकर या कलाकरांनी कमेंट केली आहे.

हेही वाचा: फक्त इंडस्ट्रीबाहेरील लोकांना काम देणार का? तापसी म्हणते..

फरहानच्या तूफान या चित्रपटाला अनेक कलाकरांनी पसंती दिली आहे. अभिनेत्री कतरिना कैफने सोशल मीडियावर पोस्ट केली ,'मला तूफान हा चित्रपट खूप आवडला, चित्रपटाच्या संपुर्ण टिमला माझ्याकडून शुभेच्छा' अभिनेत्री वाणी कपूरने लिहीले, 'खूप सुंदर चित्रपट, सर्वांनी उत्तम काम केले आहे.'

हेही वाचा: Indian Idol 12: परफॉर्मन्सदरम्यान गाणं विसरला पवनदीप; परीक्षक झाले अवाक्!

loading image