esakal | 'दंगल गर्ल'ने छेड काढणाऱ्याच्या कानशिलात लगावली; मुलाने हात उचलताच वडील आले धावून
sakal

बोलून बातमी शोधा

fatima sana shaikh

'दंगल गर्ल'ने छेड काढणाऱ्याच्या कानशिलात लगावली; मुलाने हात उचलताच वडील आले धावून

sakal_logo
By
स्वाती वेमूल

आमिर खानच्या 'दंगल' या चित्रपटात भूमिका साकारणारी अभिनेत्री फातिमा सना शेख हिने तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला. "माझे वडील माझी खंबीरपणे साथ देतात", असं म्हणत तिने त्या घटनेबद्दल सांगितलं. फातिमा जिममधून घरी परत येत असताना एक अनोळखी व्यक्ती तिच्याकडे एकटक पाहत होता. "जिममधून घरी जात असताना एक मुलगा माझ्याकडे सतत पाहत होता. त्याला थेट मी विचारलं की, काय बघतोय? त्यावर त्याने उलट उत्तर दिलं, "मी पाहिन, माझी मर्जी". मार खायचा आहे का, असं खडसावून बोलल्यानंतर त्याने पुन्हा उलट उत्तर दिलं की, मार." फातिमाने संबंधित मुलाच्या कानशिलात लगावली आणि त्यानंतर त्या मुलाने फातिमाला मुक्का मारला. त्यावेळी तिचे वडील तिच्या मदतीला धावून गेले.

फातिमाचे वडील दोन-तीन जणांना घेऊन त्या मुलाकडे गेले. त्यांना पाहून तो मुलगा रस्त्यावर पळू लागला आणि त्याच्या मागे माझे वडील, भाऊ आणि त्यांचे मित्र पळत गेले. कोणत्याही परिस्थितीत वडिलांनी नेहमीच साथ दिल्याचं तिने या मुलाखतीत सांगितलं.

हेही वाचा : धक्कादायक! भावाच्या निर्घृण हत्येप्रकरणी अभिनेत्रीला अटक

'दंगल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी फातिमाने बालकलाकार म्हणून काम केलं होतं. 'चाची ४२०' आणि 'वन टू का फोर' या चित्रपटांमध्ये तिने बालकलाकार म्हणून काम केलं होतं. 'दंगल' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं फार कौतुक झालं.

loading image