Fawad Khan: विरोध गेला खड्डयात! पाकिस्तानी चित्रपट 'द लीजेंड ऑफ मौला जट' या दिवशी होणार भारतात प्रदर्शित

Fawad Khan Pakistani film
The legend of maula jatt
Fawad Khan Pakistani film The legend of maula jatt Esakal

Fawad Khan Pakistani film फवाद खान आणि माहिरा खान स्टारर पाकिस्तानी चित्रपट 'द लीजेंड ऑफ मौला जट' जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असतांना त्याला भारतात प्रदर्शित करण्याची तयारी सुरु आहे. अशी बातमी समोर येताच भारतात या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी होऊ लागली आणि जोरदार विरोधही होऊ लागला. हा पाकिस्तानी चित्रपट देशात प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी धमकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिली होती.

Fawad Khan Pakistani film
The legend of maula jatt
The Legend Of Maula Jatt India Release: पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होणार! रणवीरच्या 'सर्कस'शी टक्कर

पाकिस्तानसोबतच 'द लीजेंड ऑफ मौला जट' जगभरातही खूप लोकप्रिय होत आहे. फवाद खानच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरात २०० कोटींची कमाई केली. भारतातही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी सुरू असल्याची बातमी अलीकडेच आली होती. (The legend of maula jatt)

पाकिस्तानी हिट जोडीचा 'द लिजेंड ऑफ मौला जट' हा चित्रपट आता भारतात रिलीजसाठी सज्ज आहे. हा चित्रपट आता भारतात 30 डिसेंबरला रिलीज होणार आहे. मात्र यावेळी यात ट्विस्ट असणार आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Fawad Khan Pakistani film
The legend of maula jatt
Pathaan Controversy: खासदारांनाच दीपिकाच्या बिकीनीत इंट्रेस्ट! 'तुम्ही आता...'

झी स्टुडिओज आता 'द लीजेंड ऑफ मौला जट' भारतात रिलीज करणार आहे. पण तो फक्त दिल्ली-एनसीआर आणि पंजाबमध्ये रिलीज होणार आहे. 'बॉलीवूड हंगामा' च्या रिपोर्टनुसार, फवादचा चित्रपट पंजाबी चित्रपट आहे. अशा परिस्थितीत हा चित्रपट देशाच्या उत्तर भागात चांगली कमाई करेल कारण तिथले लोक त्याच्याशी अधिक जोडले जातील.

30 डिसेंबर रोजी पंजाबमध्ये रिलीज झाल्यानंतर एका आठवड्यानंतर 'द लीजेंड ऑफ मौला जट' भारतील बाकीच्या भागात रिलीज होऊ शकतो, असं म्हटलं जात आहे.

पाकिस्तानमधील वाढता तणाव आणि पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर एकही पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित झाला नाही किंवा कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराने बॉलिवूडमध्ये काम केले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com