The Legend Of Maula Jatt India Release: पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होणार! रणवीरच्या 'सर्कस'शी टक्कर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The Legend Of Maula Jatt India Release

The Legend Of Maula Jatt India Release: पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होणार! रणवीरच्या 'सर्कस'शी टक्कर

Fawad Khan-starrer The Legend Of Maula Jatt expected to release in India on December 23: पाकिस्तानातील 'द लीजेंड ऑफ मौला जट ' या चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. यात फवाद खान , माहिरा खान आणि हमजा अली अब्बासी यांसारख्या पाकिस्तानातील सर्वात मोठ्या स्टार्सची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाने जगभरात कमाईच्या बाबतीत चांगलिच कामगिरी केली आहे. रिपोर्टनुसार या चित्रपटाने पाकिस्तानी चलनानुसार 10 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 200 कोटींचा व्यवसाय केला आहे. पाकिस्तानातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये या चित्रपटाचं क्रेझ पाहायला मिळत आहे.

पाकिस्तानी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात महागडा चित्रपट हा 'द लिजेंड ऑफ मौला जट' आहे. सुमारे 100 कोटी रुपयांच्या बजेट तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने बजेटनुसार चांगली कमाई केली आहे. चित्रपटाच्या अधिकृत इंस्टाग्रामनुसार, 21 नोव्हेंबरलाच त्याने 200 कोटी रुपयांचा टप्पा पार केला. हा चित्रपट 13 ऑक्टोबर रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

हेही वाचा - First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

'द लीजेंड ऑफ मौला जट' हा चित्रपटाला भारतात रिलीज करण्याच तयारी सुरू झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे . त्याची रिलीज डेट 23 डिसेंबर असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या दिवशी रणवीर सिंगचा मल्टीस्टारर चित्रपट सर्कस मोठ्या पडद्यावर येत आहे. अशा परिस्थितीत जर फवाद खानचा पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित झाला तर त्याची टक्कर सर्कस चित्रपटाशी असेल.

हेही वाचा: Swasthyam 2022: प्राणायाम करताना या सात गोष्टी लक्षात ठेवा

हेही वाचा: Mahira Khan: मला शाहरुखसोबत...पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा भलतंच बोलून गेली..

एका बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, “द लीजेंड ऑफ मौला जट 23 डिसेंबरला भारतात रिलीज होणार आहे. झी स्टुडिओज या चित्रपटाला भारतात रिलीज करण्याचा प्रयत्न करत आहे. 23 तारखेलाच रिलीज होणार की त्यासाठी आणखी काही तारीख निवडली जाईल, हे पुढील आठवड्यात स्पष्ट होईल.