चित्रपट दिग्दर्शक रजत मुखर्जीं यांचे जयपूरमध्ये निधन....

rajat mukherjee
rajat mukherjee

मुंबई : 'प्यार तुने क्या किया', 'रोड', 'उम्मीद', 'लव इन नेपाळ' यासारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे  किडनीच्या आजाराने जयपूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अभिनेता मनोज वाजपेयी, दिग्दर्शक हंसल मेहता, अनुभव सिन्हा यांनी ट्विटरद्वारे आपला शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीला आणखी एक धक्का बसला आहे.

रजत मुखर्जी हे मुंबईत राहणारे असले तरी त्यांचे घर जयपूर येथे होते. लॉकडाऊनच्या काळात ते आपल्या घरी परतले होते. त्यांना गेले काही महिने किडनीचा आजार होता. एप्रिल महिन्यात एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.  त्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले. अखेर त्यांनी आपल्या राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला. 

रानभाज्या विक्रीच्या हंगामाला लॉकडॉऊनचा फटका; अदिवासी बांधवांची होतेय उपासमार

त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत दुःख व्यक्त करण्यात येत आहे. एक प्रयोगशील दिग्दर्शक हरपला आहे. अभिनेता मनोज वाजपेयी यांनी ट्विट करीत म्हटले आहे की , ''माझा एक सच्चा दोस्त आज आपल्यात नाही. माझा तर विश्वासच बसत नाही. आजारपणात तू मोठ्या हिमतीने राहिलास. तू जेथे आहेस, तेथे आनंदी रहा.'' 

दिग्दर्शक अनुभव सिंहा यांनीही ट्विट करीत म्हटले आहे की, ''मित्रा फार लवकर मला सोडून गेलाय. काही महिन्यांपासून आजारी होतास आणि जयपूरमध्ये आनंदाने होतास. तुझ्या खूप आठवणी आहेत''. दिग्दर्शक हंसल मेहता यांनीही  रजत यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. ''प्यार तुने क्या किया आणि रोड यांचे दिग्दर्शक असलेले रजत हे माझे संघर्षाच्या काळात जवळचे स्नेही होते. आपण कित्येक वेळा एकत्रित जेवण केले. तुझी सारखी आठवण येईल.''

----

संपादन ः ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com