'भीक मागून मिळालं स्वातंत्र्य' म्हणणाऱ्या कंगनावर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress kangana ranaut
'भीक मागून मिळालं स्वातंत्र्य' म्हणणाऱ्या कंगनावर गुन्हा दाखल

'भीक मागून मिळालं स्वातंत्र्य' म्हणणाऱ्या कंगनावर गुन्हा दाखल

मुंबई - वादविवादासाठी ओळखल्या जाणाऱ्या कंगनानं दोन दिवसांपूर्वी देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याबाबत टोकाचं विधान केलं होतं. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. त्यावरुन तिच्यावर तीव्र शब्दांत नेटकऱ्यांनी टीका केली आहे. याशिवाय काही राजकीय नेते, बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी देखील कंगनाच्या त्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करुन तिला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा. अशी मागणी केली आहे. दरम्यान कंगनावर देशातील काही शहरांमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता कंगनाच्या अडचणीत वाढ होणार आहे.

केवळ आपल्या अभिनय नव्हे तर बेताल आणि माथी भडकावणारी विधान करण्यात कंगना अग्रेसर असल्याचे दिसून आले आहे. देशाला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक मागून मिळाले. खरं स्वातंत्र्य हे 2014 मध्ये मिळालं. असं वादग्रस्त वक्तव्य कंगनानं केलं होतं. याशिवाय महात्मा गांधी यांच्यावरही तिनं टीका केली होती. त्यामुळे तिच्या या वक्तव्याचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. आता तिच्यावर राजस्थानातील चार शहरांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयपूरच्या सुखेर, जयपूर, जोधपूर आणि शास्त्रीनगरमध्ये कंगनावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यावर पोलिसांनी याप्रकरणाच्या तपासाला सुरुवातही केली आहे. याविषयी जयपूर महिला कॉग्रेसच्या वतीनं तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांनी कंगनावर असा आरोप केला आहे की, कंगनानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या व्यक्तींनी बलिदान दिले त्यांचा अपमान केला आहे.

देशाच्या प्रती ज्या व्यक्तीनं आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं त्यांचा अवमान कंगनानं तिच्या वक्तव्यातून केल्यानं तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे तक्रारीत म्हटले आहे. महिला मोर्चाच्या अध्यक्षा रानी लुबाना यांनी कंगना रनौतच्या विरोधात तक्रार दिली आहे. आपला देश 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र झाला. मात्र त्यासाठी हजारो व्यक्तींनी बलिदान दिले. हे विसरता कामा नये. त्यांचा अपमान होईल असे वक्तव्य चूकीचं आहे. जे कंगनानं केलं. असे तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

हेही वाचा: Movie Review; जीव गमावलेली कथा 'हम दो हमारे दो', निव्वळ पांचट...

loading image
go to top