''माझ्या क्रेझी पार्टनरसोबतची ही पहिलीच डान्सिंग रील"Priya Bapat,Umesh kamat dance video viral,Badshah jugnu song | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Priya Bapat,Umesh Kamat

प्रिया बापट आणि उमेश कामतचा 'जुगनू' डान्स!

प्रिया बापट आणि उमेश कामत ह्यांना मराठी सिनेइंडस्ट्रीतलं एक 'लव्हेबल कपल' म्हणून ओळखलं जातं. लग्नाला अनेक वर्ष होऊनही यांच्यातील प्रेमाचा गोडवा जराही कमी झालेला नाही. सोशल मीडियावर हे दोघेही बरेच अॅक्टिव्ह असतात. आज प्रिया बापट हे नाव मराठी इंडस्ट्रीसोबतच बॉलीवूड आणि ओटीटी माध्यमातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत आहेत. तर उमेश कामतही मराठी सिनेमांसोबत छोट्या पडद्यावरचा सर्वात आवडता कलाकार आहे. दोघेही कामात व्यग्र असले तरी आपल्या फिटनेसवरही ते मेहनत घेताना दिसतात. त्याचे व्हिडीओही हे दोघे शेअर करीत असतात.

हेही वाचा: नेहा कक्करची 'ती' बातमी अखेर ठरली खरी!

आज प्रियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ रील शेअर केलीय. ज्या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत तिचा नवरा आणि अभिनेता उमेश कामतही म्युझिकच्या बीट्सवर ठेका धरताना दिसत आहेत. रॅपर बादशहाच्या नवीन 'जुगनू' या गाण्यावर त्या दोघांनी हा ठेका धरलाय. या गाण्यात बादशहासोबत निखिता गांधीचाही आपल्याला आवाज ऐकायला मिळतोय. प्रिया आणि उमेशचा हा जुगनू डान्स सध्या त्यांच्या फॅन्सचं लक्ष वेधून घेतोय. आदित्य कृपालानी या निर्मात्याने या व्हिडिओवर कमेंट शेअर करीत म्हटलंय,"हा डान्स पाहून पाच बॉलीवूड फिल्म्स तुमच्याकडे जर चालून आल्या तर नवल नव्हे.'' अशाच अनेक सुंदर कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत.

या व्हिडिओत प्रिया आणि उमेश आपल्या इमारतीच्या गच्चीवर हा डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या पाठमोरी सूर्य अस्ताला जातानाचं आकाशातलं सुंदर दृश्य त्या डान्समध्ये अधिक रंगत भरीत आहे. सिंपल आऊटफीट्स घालूनही दोघेही नेहमीप्रमाणे कूल दिसत आहेत. अॅक्शन,कॅमेरा,रोलिंग असं काहीही होत नसताना दोघांनी जो काय डान्स केलाय याला तोड नाही. प्रियानं या व्हिडीओला कॅप्शन दिलंय की,''माझ्या क्रेझी पार्टनरसोबतची ही पहिलीच डान्सिंग रील".

loading image
go to top