'भुज- द प्राइड ऑफ इंडिया' चित्रपटातील सोनाक्षी सिन्हाचा फर्स्ट लूक लॉन्च

संतोष भिंगार्डे
Friday, 17 July 2020

भारतीय सेनेला पाठिंबा देण्यासाठी तिच्याबरोबर 299 महिलांना घेऊन लढायला गेलेल्या शूर समाजसेविका सुंदरबेन जेठा माधापर्या यांची भूमिका ती साकारणार आहे.

मुंबई : लॉकडाऊनमुळे सिनेमागृह बंद आहेत. त्यामुळे डिस्नी प्लस हॉटस्टारने मागील महिन्यात त्यांच्या ओटीटीवर रिलीज होणाऱ्या चित्रपटांची पोस्टर्स शेअर करत घोषणा केली. त्यामध्ये 'भुज-द प्राइड ऑफ इंडिया' हा सिनेमाचाही समावेश होता. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टर्समध्ये अजय देवगण होता. आता या सिनेमाचे दुसरे पोस्टर्स लाँच झाले आहे आणि त्यामध्ये सोनाक्षी सिन्हाची झलक पाहायला मिळते. 

ल्युकेमिया असतानाही 'तिने' केली कोरोनावर यशस्वी मात; 9 वर्षाच्या चिमुरडीची कहाणी... ​

भारतीय सेनेला पाठिंबा देण्यासाठी तिच्याबरोबर 299 महिलांना घेऊन लढायला गेलेल्या शूर समाजसेविका सुंदरबेन जेठा माधापर्या यांची भूमिका ती साकारणार आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवर या व्यक्तिरेखेचा पहिला लुक शेअर केला. यावेळी सोनाक्षीने लिहिले की, "भारतीय सैन्य दलाला पाठिंबा देण्यासाठी 299 महिलांसोबत युद्धभूमीवर गेलेल्या शूर समाजसेविका सुंदरबेन जेठा माधापर्या यांची भूमिका मला साकारायला मिळाली हे माझं भाग्य आहे! 

'कारपेटखाली कचरा दडवू नका'; भाजप आमदारांनी पालिका आयुक्तांना सुनावले...

भुज- प्राइड ऑफ इंडिया ही आपल्या देशाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात अजय देवगणसह संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, अ‍ॅमी विर्क आणि शरद केळकर हे कलाकार देखील आहेत. भुज- द प्राइड ऑफ इंडिया या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक दुधय्या यांनी केले आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first look of sonakshi sinha from Bhuj-The pride of India released