मराठी चित्रपटसृष्टीचे नवे पाऊल; थेट न्यू जर्सीत होणार मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव..   

संतोष भिंगार्डे
मंगळवार, 14 जुलै 2020

या महोत्सवाच्या निवड समितीत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आणि 'बकेट लिस्ट ' या चित्रपटाचे निर्माते अशोक सुभेदार यांचा समावेश आहे. तर हेमंत पांड्या कार्यकारी संचालक आहेत.

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आशयघन आणि दर्जेदार चित्रपटांची निर्मिती होत आहे. अनेक चित्रपटांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घेतली असल्याचे आपण पाहिलेले आहे. आता आणखी एक महत्त्वपूर्ण घटना मराठी चित्रपटसृष्टीत घडत आहे.  देशाबाहेरच्या पहिल्या मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2021 चे अमेरिकेतील न्यू जर्सी येथे आयोजन करण्यात आले आहे.  

चिंताजनक! राज्यातील युवाशक्तीच कोरोनाच्या सावटात; तब्बल 'इतक्या' हजारांहून अधिक तरुणाईला बाधा...

याबाबत अधिक माहिती देताना MIFFच्या संचालिका नीता पेडणेकर सांगतात की, मराठी संस्कृती, कला, मूल्ये, परंपरा, संगीत यांचे अमेरिकेत जतन करणे हा या मराठी चित्रपट महोत्सवाच्या आयोजनामागील हेतू आहे. 'नेटफ्लिक्स' आणि 'अॅमेझॉन' या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचेही या महोत्सवासाठी सहकार्य लाभणार आहे. या महोत्सवाच्या निवड समितीत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आणि 'बकेट लिस्ट ' या चित्रपटाचे निर्माते अशोक सुभेदार यांचा समावेश आहे. तर हेमंत पांड्या कार्यकारी संचालक आहेत.

चिंताजनक! राज्यातील युवाशक्तीच कोरोनाच्या सावटात; तब्बल 'इतक्या' हजारांहून अधिक तरुणाईला बाधा...

मराठीत गेल्या काही वर्षांपासून काही वेगळे आणि दर्जेदार चित्रपट निर्माण होत आहेत. त्यासाठी 'श्वास', 'सैराट', 'किल्ला', 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'नटरंग', 'फॅन्ड्री', 'देऊळ', 'नटसम्राट', 'काकस्पर्श', 'कट्यार काळजात घुसली', 'नाळ' या चित्रपटांचा खास उल्लेख करायला हवा. 'श्वास' आणि 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' या चित्रपटांची तर भारताची ऑस्करसाठीची विदेशी चित्रपट विभागात अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली. अलिकडच्या काळात मराठीत नागराज मंजुळे (सैराट), चैतन्य ताह्मणे (कोर्ट), अविनाश-अरुण (किला) अशा नवीन दृष्टीचे दिग्दर्शक आले. न्यू जर्सी मराठी चित्रपट महोत्सवात मोफत प्रवेश घेता येईल, असे या महोत्सवाची संचालिका नीता पेडणेकर यांनी म्हटले आहे. त्यासाठी filmsfreeway.com येथे प्रवेश घेता येईल.        
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first marathi internation film festival going to organise in new jersy in 2021