Sameer Wankhede Case: 'माझा नवरा कसा हे' आर्यन खान लाचखोरी प्रकरणावर क्रांती स्पष्टच बोलली...

Sameer Wankhede Case: 'माझा नवरा कसा हे' आर्यन खान लाचखोरी प्रकरणावर  क्रांती स्पष्टच बोलली...

बॉलीवूडचा बादशाह शाहरुखचा मुलगा आर्यन खानचं क्रुझ पार्टी प्रकरण हे खुपच गाजलं होतं. आता या प्रकरणाला बरेच दिवस झाले. मात्र आता पुन्हा हे प्रकरण चर्चेत आलं आहे. त्याच कारण आहे तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे ज्यांनी आर्यनला अटक केली होती.

आता वानखेडे यांच्यावर ईडीनं कारवाई केली आहे. सीबीआयनं केलेल्या तपासातून मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकच नाही तर आर्यन खानच्या प्रकरणात समीर वानखेडेंनी खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे आणि त्यांचे अन्य तीन सहकारी यांनी आर्यन खानकडून तब्बल २५ कोटींची खंडणी मागीतली होती अशी माहिती समोर आली आहे.

Sameer Wankhede Case: 'माझा नवरा कसा हे' आर्यन खान लाचखोरी प्रकरणावर  क्रांती स्पष्टच बोलली...
OTT Release This Week: पंख्याचा गार वारा अंगावर घ्या, मस्त सिनेमे पाहा! OTT देतेय सिनेमांची मेजवानी

या माहितीमुळे सगळेच आता आश्चर्य व्यक्त करत आहेत. यामुळे पुन्हा वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे वानखेडे आणि त्यांचे अन्य सहकारी यांच्यापुढील प्रश्न आणखी गंभीर होणार असल्याचे बोलले जात आहे. आता त्यातच सर्वच स्तरावरुन याप्रकरणी चर्चा सुरु झाली आहे.

अशातच आता समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी सुद्धा या विषयावर भाष्य केलं आहे. आर्यन खान लाचखोरी प्रकरणाबद्दल त्यांना विचारलं असता एनसीबीच्या माजी अधिकाऱ्याची पत्नी म्हणजेच क्रांती रेडकर हिने म्हटले आहे की, समीर वानखेडेवरील आरोप चुकीचे आहेत हे सर्वांना माहीत आहे.

याचाच अर्थ असा की, क्रांती रेडकरने पतीवर लावण्यात आलेले सारेच आरोप फेटाळून लावले आहेत.

Sameer Wankhede Case: 'माझा नवरा कसा हे' आर्यन खान लाचखोरी प्रकरणावर  क्रांती स्पष्टच बोलली...
Riteish Deshmukh Video: आजीसोबतचं 'हे' नातं पाहून तुम्हीही म्हणाल, रितेशची मुलं म्हणजे दृष्ट लागण्याजोगी..

या प्रकरणावर सविस्तर बोलतांना क्रांती म्हणाली, “त्यांच्याविरोधातील सर्व आरोप खोटे आहेत, हे प्रत्येकाला माहित आहे. हे फक्त आरोप आहेत आणि आम्ही सीबीआयच्या चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करत आहोत. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही चौकशीला पूर्णपणे सहकार्य करतोय”.

तर दुसरीकडे देशभक्त असल्याचं बक्षीस मिळत असल्याची प्रतिक्रिया वानखेडेंनी शनिवारी दिली आहे. “मी देशभक्त असल्याचं बक्षीस मला मिळत आहे. काल सीबीआयच्या 18 अधिकाऱ्यांनी माझ्या घरी छापे मारले. माझ्या पत्नी आणि मुलांसमोर जवळपास 12 तास ही छापेमारी सुरू होती. त्यांना 23 हजार रुपये आणि चार प्रॉपर्टीची कागदपत्रं सापडली. मी कामावर रुजू होण्याआधी ती प्रॉपर्टी घेतली होती”, असं ते म्हणाले.

Sameer Wankhede Case: 'माझा नवरा कसा हे' आर्यन खान लाचखोरी प्रकरणावर  क्रांती स्पष्टच बोलली...
Madhuri Dixit Net Worth: दौलत है, शौहरत है.. पण नेट वर्थ किती? माधुरी आहे 'इतक्या' करोडोंची मालकीण! वयाच्या पन्नाशीतही कमाई सुरुच..

अभिनेत्री म्हणून क्रांती रेडकर हिनं मराठी मनोरंजन विश्वात स्थान निर्माण केलं आहे. ती नेहमीच आपल्या घरचे व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते .त्या व्हिडिओमुळे ती चर्चेतही असते. मात्र सध्या ती वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे. क्रांती अनेकदा वेगवेगळ्या विषयांवर आपले विचार मांडत असते. क्रांती आर्यन खान प्रकरणावेळीही ती समीर वानखेडेच्या पाठीशी खंबरीपणे उभी होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com