Gandhi Godse Ek Yudh: 'आपल्याला नथुराम समजलाच नाही!', असं का म्हणाला चिन्मय मांडलेकर? Chinmay Mandlekar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gandhi Godse Ek Yudh

Gandhi Godse Ek Yudh: 'आपल्याला नथुराम समजलाच नाही!', असं का म्हणाला चिन्मय मांडलेकर?

Gandhi Godse Ek Yudh: राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘गांधी गोडसे- एक युद्ध’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या टीझरची चर्चा होती. जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरने आता नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

महात्मा गांधी आणि नुथराम गोडसे यांच्या विचारधारेतील युद्धाची झलक या ट्रेलरमध्ये पहायला मिळते. अभिनेते दीपक अंतानी यामध्ये गांधींच्या भूमिकेत आहेत. तर मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर या चित्रपटात नथुराम गोडसेंची भूमिका साकारतोय.(Gandhi Godse Ek Yudh trailer chinmay mandlekar interview )

हेही वाचा: Gandhi Godse Ek Yudh : गोडसे काही सुपारी किलर नव्हता.. 'गांधी-गोडसे'चे दिग्दर्शकाचं मोठं विधान..

चिन्मय मांडलेकरने या आधी देखील अशा ऐतिहासिक भुमिका केल्या आहेत. मग छत्रपती शिवाजी महाराजांची असो किंवा संत तुकारामांची असो..प्रत्येक भूमिकेत त्यानं लोकांची प्रशंसा मिळवली होती. आता नथुराम गोडसेची भूमिका एक वेगळ्या धाटणीची आणि वादग्रस्त भूमिका आहे.

सामच्या मुलाखतीत चिन्मय मांडलेकरने या भूमिकेविषयीची आपली काही मतं मांडली आहेत. तो मुलाखतीत म्हणाला,''आपल्या समाजात दोन विचारांची लोक असतात काही लोक एखाद्या मुद्द्यावर चर्चा करणारे आणि काही एखादा मुद्दा सोडून देणारे..''

''या आधीपण नथुराम गोडसे यांच्यावर नाटक आणि चित्रपट झाले आहेत तेव्हापण वाद विवाद झाले होते, पण आपण कधी हे नाही समजून घेतले की नथुराम गोडसे यांनी असे का केले? तेव्हा आता त्यांची बाजू समजून घेणे आवश्यक आहे..आणि हा चित्रपट त्याच गोष्टीवर आधारित आहे''.

या चित्रपटातून दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची मुलगी तनिशा संतोषी पदार्पण करत आहे. तिच्या भूमिकेचीही झलक या ट्रेलरमध्ये पहायला मिळते. हा चित्रपट येत्या 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

विशेष म्हणजे त्याच्या आदल्याच दिवशी म्हणजे 25 जानेवारी रोजी शाहरुख खानचा ‘पठाण’ हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोन भिन्न विषयांच्या चित्रपटांची टक्कर पहायला मिळणार आहे.