Murder Case:सिद्धू मूसेवाला हत्याप्रकरण लवकरच लागणार मार्गी ? "होय माझ्याच गँगने केली सिद्धू मुसेवालाची हत्या" म्हणत दिली कबुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lawence Bishnoi's Gang killed sidhu moosewala

सिद्धू मूसेवाला हत्याप्रकरण लवकरच लागणार मार्गी ? "होय माझ्याच गँगने केली सिद्धू मुसेवालाची हत्या" म्हणत दिली कबुली

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याला राज्यसरकारकडून(State Government) सुरक्षा देण्यात आली होती.राज्यसरकारने सुरक्षा काढून टाकताच दुसऱ्याच दिवशी त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.ही घटना पंजाबच्या मानसा जिल्ह्यात घडली होती.याप्रकरणी गँगस्टर (Gangster)लॉरेन्सचं नाव पुढं आलं होतं.पोलीसांच्या कडक तपासणीनंतर आता लॉरेन्सनं त्याचं मौन सोडलं आहे.

सिद्धूच्या हत्येपासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.सिद्धू जिपने गावी जात असताना त्याची हत्या करण्यात आली होती.(Murder Case)पोलीसांच्या चौकशीदरम्यान लॉरेन्स मौन व्रत तोडत म्हणाला,"यावेळी हे काम माझं नाही कारण मी त्याच्या हत्येच्या आधीपासून तुरूंगात आहे आणि फोनचा वापरही करत नाहीये.पण मी हे कबुल करतो सिद्धू मूसेवाल्याची हत्या माझ्याच गँगनी केली आहे.मला त्याच्या मृत्यूची माहिती तिहार जेलमधील टिव्हीच्या बातम्यांतून मिळाली."

हेही वाचा: Sidhu Moose Wala Murder : कंगना भडकली, पंजाब सरकारवर साधला निशाणा

कोण आहे लॉरेन्स बिश्नोई ?

लॉरेन्स हा पंजाब,हरयाणा आणि राजस्थान या राज्यांत दहशत माजवणारा कुख्यात डाकू आहे.तुरूंगात राहून देखिल आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तो त्याची दहशत कायम ठेवतो.(punjab police)२०१८ मधे या गुंडाने सलमानला जिवे मारण्याची धमकी दिली होती.तेव्हापासून तो आणखीनच चर्चेत आला.लॉरेन्स कॉलेजमधे असताना कॉलेजच्या निवडणूकीत सहभागी झाला होता.त्यात पराभव झाल्याने त्याने चक्क विरोधकांवर गोळ्या झाडल्या होत्या.तेव्हापासून त्याने गुंडगिरीला सुरूवात केली.त्याच्याविरोधात ५० पेक्षा जास्त हत्येचे गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा: Siddhu Moosewala Murder: सिद्धू सुरक्षा कपात करणं आप सरकारची डोकेदुखी वाढवणार?

सिद्धू मूसेवालाच्या हत्येला पाच दिवस झाले आहेत.या हत्येप्रकरणी पंजाब,हरयाणा,राजस्थान,मध्यप्रदेश ते कॅनडापर्यंतचं कनेक्शन पुढं आलं आहे.तरी पोलीस मात्र अजूनही लॉरेन्स बिश्नोईचीच चौकशी करत आहेत.सिद्धूच्या हत्येपूर्वी घराबाहेर रेकी करताना आणि हत्येनंतर धावत्या गाड्यासुद्धा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या आहेत.

Web Title: Gangster Lawrence Revealed That His Gang Killed Sidhu Moosewala

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top