Sidhu Moose Wala Murder : भडकली कंगणा, पंजाब सरकारवर साधला निशाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kangana ranaut
Sidhu Moose Wala Murder : भडकली कंगणा, पंजाब सरकारवर साधला निशाणा

Sidhu Moose Wala Murder : कंगना भडकली, पंजाब सरकारवर साधला निशाणा

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची रविवारी दिवसाढवळ्या निर्घूण हत्या करण्यात आली. काही अज्ञानीतांनी एकामागून एक करत त्याच्या गाडीवर ३० गोळ्या झाडल्या. मूसेवालाच्या मृत्यूनंतर पंजाबचं नव्हे तर संपूर्ण हळहळ व्यक्त केली जात आहे. बॉलीवूडची क्विन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतनेदेखील मूसेवालाच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करत पंजाब सरकारवर चांगलीच भडकली आहे.

हेही वाचा: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या

पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवाला च्या हत्येनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. पंजाबमधील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई चा कॅनडास्थित साथीदार गोल्डी ब्रार याने सिद्धू मूसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याच्या या हत्येबाबत कंगनाने नुकतंच इस्टा पोस्ट केली आहे. जी सध्या चर्चेत आली आहे.

'पंजाबचा प्रसिद्ध चेहरा सिद्धू मुसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हे अतिशय दुःखद आहे. ही घटना पंजाबच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे स्पष्ट वर्णन करते.' अशा आशयाची पोस्ट कंगणाने इंस्टावर शेअर केली आहे.

हेही वाचा: सिद्धू मुसेवालानंतर आणखी एक प्रसिद्ध गायक निशाण्यावर; पोलिसांची भीती

कंगणाच्या या पोस्टमुळे पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे. कंगणाची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या

रविवारी (२९ मे २०२२) सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala killed by gangsters) वर गोळीबार केला. यात मूसेवाला आणि त्यांचे दोन साथीदार गंभीर जखमी झाले. तिघांनाही तात्काळ इस्पितळात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी सिद्धू मूसेवाला यांना मृत घोषित केले. सिद्धू मूसेवाला आणि त्याच्या साथीदारांवर ३० राऊंड गोळीबार करण्यात आला.

Web Title: Kangana Ranaut Mourns Sidhu Moose Walas Death Questions Punjabs Law And Order Situation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top