Oscar शर्यतीत आलियाचा गंगूबाई काठियावाडी? RRR,काश्मीर फाईल्सला देणार टक्कर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gangubai Kathiawadi, RRR And The Kashmir Files

Oscar शर्यतीत आलियाचा गंगूबाई काठियावाडी? RRR,काश्मीर फाईल्सला देणार टक्कर

Gangubai Kathiawadi Oscar May Be Official Entry : संजय लीला भन्साळी यांचे चित्रपट केवळ भारतातच नाही तर परदेशातही कमाल करतात. आतापर्यंत त्यांचे अनेक चित्रपट परदेशी प्रेक्षकांना आवडले आहेत. गेल्या दोन दशकांबद्दल बोलायचे तर २००२ साली प्रदर्शित झालेला त्यांचा 'देवदास' हा चित्रपट ऑस्कर सोहळ्याच्या सर्वात जवळ पोहोचला होता. या चित्रपटात शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांची भूमिका होती. दरम्यान, ताजी चर्चा अशी आहे की आलिया भटची मुख्य भूमिका असलेला 'गंगुबाई काठियावाडी'चा (Gangubai Kathiawadi) ऑस्करमध्ये (Oscar) भारताकडून अधिकृत एंट्री होऊ शकते.

या वर्षाच्या सुरुवातीला गंगूबाई काठियावाडीचे आंतरराष्ट्रीयस्तरावर अनेक प्रीमियर झाले. बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्येही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. केवळ प्रशंसाच नाही तर या चित्रपटाने परदेशातही चांगली कमाई केली आहे. परदेशात ७.५० दशलक्ष डाॅलर कमावणारा हा आंतरराष्ट्रीय पट्ट्यातील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट आहे. (Entertainment News)

गंगूबाई व्यतिरिक्त एसएस राजामौली यांचा पीरियड ड्रामा आरआरआर ऑस्करसाठी पाठवला जाणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. याशिवाय विवेक अग्निहोत्रीचा 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करू शकतो, अशीही चर्चा आहे. 'गंगूबाई काठियावाडी' हा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित १० वा चित्रपट आहे. यापूर्वी त्यांनी खामोशी, हम दिल दे चुके सनम, देवदास, ब्लॅक, सावरिया, गुजारिश, राम लीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत सारखे चित्रपट केले आहेत.

सध्या भन्साळी नेटफ्लिक्ससाठी 'हिरामंडी' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यानंतर ते २०२३ मध्ये बैजू बावराकडे वळणार आहेत. दुसरीकडे, आलिया भट बद्दल (Alia Bhatt) बोलायचे झाले तर ती लवकरच 'ब्रह्मास्त्र'मध्ये दिसणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात ती पहिल्यांदाच रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक मानला जातो.