esakal | वाढदिवसानिमित्त संजय लिला भन्साळींची प्रेक्षकांना 'भेट'
sakal

बोलून बातमी शोधा

gangubai kathiayawadi teaser

'गंगूबाई काठीयावाडी'मध्ये आलिया भट सोबत हूमा कुरेशी, अजय देवगन आणि इमरान हाश्मी हे कलाकार दिसणार आहेत.

वाढदिवसानिमित्त संजय लिला भन्साळींची प्रेक्षकांना 'भेट'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिध्द फिल्म मेकर संजय लिला भन्साळी हे ऐतिहासिक चित्रपटांसाठी ओळखले जातात. मोठे सेट, उत्तम संगित आणि ऐतिहासिक कथानक या सर्व गोष्टी संजय लिला भन्साळी यांच्या चित्रपटात असतात. असाच एक बहूचर्चित चित्रपट म्हणजे गंगूबाई काठीयावाडी. गंगूबाई कोठेवाली यांच्या जिवनावर अधारित चित्रपट आहे. हूसेन जैद यांच्या 'माफिया क्विन ऑफ मुंबई' पुस्तकावर चित्रपटाचे कथानक आहे. 

प्रियांका चोप्रा गंगूबाई काठीयावाडीमध्ये काम करणार होती, तेव्हा आधी चित्रपटाचे नाव 'हिरा मंडी' असे होते. मात्र त्यानंतर आलीयाला मुख्य भूमिका मिळाली. त्यानंतर चित्रपटाचं नाव 'गंगुबाई काठीयावाडी' असं करण्यात आलं. 

हे वाचा - Photo : करीनाच्या मुलाचा पहिला फोटो आला समोर; तुम्ही पाहिलात का?

'गंगूबाई काठीयावाडी'मध्ये आलिया भट सोबत हूमा कुरेशी, अजय देवगन आणि इमरान हाश्मी हे कलाकार दिसणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार असून टिझर दिग्दर्शक संजय लिला भन्सालींच्या वाढदिवशीच 24 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा : दोन मुलं झाल्यानंतरही इतकी फिट कशी? शाहिदच्या पत्नीने सांगितलं सिक्रेट

चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. चित्रपटामध्ये आलिया भट हटके भूमिकेत दिसेल. त्यामुळे आलियाचे चाहते हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहात आहेत. याआधी डियर जिंदगी, हायवे, स्टुडन्ट ऑफ द इयर आणि उडता पंजाब यांसारख्या चित्रपटांमधून आलियाने प्रेक्षकांचे मनोरंजन केलंय.