Riteish - Genelia Viral Video: तुम्ही मला श्रावणी दिली तर मी.. जिनिलियाची सर्वांसमोर अहोंना गोड हाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

riteish deshmukh, genelia deshmukh, ved, zee chitra gaurav 2023

Riteish - Genelia Viral Video: तुम्ही मला श्रावणी दिली तर मी.. जिनिलियाची सर्वांसमोर अहोंना गोड हाक

Riteish - Genelia Deshmukh Viral Video: सध्या झी गौरव पुरस्कार २०२३ (Zee Chitra Gaurav 2023) ची जोरदार चर्चा आहे. या पुरस्कार सोहळ्यात रितेश देशमुख आणि त्याची बायको महाराष्ट्राची लाडकी वहिनी जिनीलीया देशमुख यांची एकदम हवा आहे.

नुकताच या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर वायरल झालाय. या व्हिडीओत जिनीलियाने सर्वांसमोर तिच्या लाडक्या अहोंना गोड अंदाजात हाक मारली.

(genelia funny and romantic action with riteish deshmukh after she got best actress award)

झी गौरव पुरस्कार २०२३ पुरस्कार सोहळ्यातला एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत जिनीलियाच्या हातात पुरस्कार असुन तिला लोकप्रिय अभिनेत्री चित्रपट हा पुरस्कार मिळाला आहे.

हा पुरस्कार मिळताच जिनीलियाला खुप आनंद झाला. पुढे सर्वांचे आभार मानताना जिनीलियाने रितेशकडे पाहीलं आणि गोड स्माईल दिलं.

पुढे जिनीलिया रितेशकडे बघत म्हणाली, अहो.. तुम्ही मला श्रावणी दिली तर मी तुम्हाला हे अॅवॉर्ड देणार. लव्ह यू असं म्हणत जिनीलियाने रितेशचे आभार मानले आहेत. हे ऐकताच सर्वांनी जिनीलयाचे कौतुक केलं.

अगदी अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांनीही टाळ्या वाजवल्या. पुढे श्रेयस तळपदेने रितेशला स्टेजवर विचारलं... रितेश स्टेजवर गेला आणि तो जिनीलियाच्या पाया पडला.

रितेश देशमुख आणि जिनीलिया देशमुख हे कपल बॉलीवूडकरांना जितकं प्रिय आहे तितकीच या कपलची क्रेझ मराठी इंडस्ट्रीतही आहे. त्यांच्या लव्ह स्टोरीपासनं ते त्यांच्या सुखी संसारापर्यंत साऱ्याच गोष्टींचा लोक हेवा करतात.

आज लग्नाच्या १२ वर्षानंतरही हे सेलिब्रिटी कपल आपल्यातील बॉन्डिंग,प्रेम ज्यापद्धतीनं वर्षागणिक फुलवताना दिसत आहे ते सगळ्यांनाच प्रेरित करणारं आहे. नुकताच या दोघांचा वेड हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान हिट झाला.

रितेशनं आणि जिनीलियानं मंचावर आपल्या सुपरहिट 'वेड' सिनेमातील 'मला वेड लागलंय' गाण्यावर डान्सही केला. अर्थात गाण्याची हुकअप स्टेप पाहून अनेकांना डान्सचा मोह आवरला नाही.

रितेश देशमुख निर्मित-दिग्दर्शित 'वेड' या मराठी सिनेमानं ७५ करोडचा बिझनेस आतापर्यंत करत अनेक रेकॉर्ड मराठीतले मोडीत काढले आहेत.

अजूनही 'वेड' सिनेमाची आणि त्यातील गाण्यांची क्रेझ लोकांमध्ये पहायला मिळत आहे.