
Giorgia Andriani Video: आता तर कहरच! अरबाज खानच्या गर्लफ्रेंडवर चढलं उर्फीचं भुत..आली पानं चिकटवून...
बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड अभिनेत्री आणि मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी ही तिच्या बोल्डनेसमुळं नेहमीच चर्चेत असते. अरबाजची गर्लफ्रेंड खूप हॉट आहे. ती सोशल मीडियावर नवनवीन फोटो आणि व्हिडिओंद्वारे चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत असते. तसेच ती रोज संध्याकाळी तिच्या कुत्र्यासोबत घराबाहेर पडते आणि मीडियासमोर काही पोज देते. तिचे हे व्हिडिओ सोशल मिडियावर बरेच व्हायरल होत असतात. तिचे फोटो पाहिल्यानंतर नेटकरी तिची मलायका अरोरासोबत तुलना करतात.
अरबाजने अभिनेत्री मलायका अरोरापासून घटस्फोट घेतला होता आणि आता तो जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत असल्याची चर्चाआहे.जॉर्जियाने नुकताच तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती तिच्या बोल्ड लूकने सर्वांच्याच नजरेत आली आहे. जॉर्जियाचा हा नवा लूक पाहून तिने उर्फी जावेदलाही मागं टाकल्याचं नेटकऱ्यांचं म्हणनं आहे.
जॉर्जिया अँड्रियानीचा नवीन व्हिडिओ हा एका गाण्याच्या शुटिंगवेळचा आहे. यात तिच्याभोवती झाडे आणि वनस्पती असलेला हा सेटअप आहे, जिथे हा व्हिडिओ शूट करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये जॉर्जियाचा लूक एखाद्या झाडांसारखाच आहे. जॉर्जियाने ब्रा आणि मिनी स्कर्ट घातला आहे जो हिरव्या रंगाचा आहे. जॉर्जियाचा हा नवीन ड्रेस पानांचा बनलेला आहे.
हा तिच्या आगामी गाण्याचा आणि संगीत व्हिडिओ 'बीबा' चा एक भाग आहे जो जॉर्जिया एंड्रियानीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर प्रमोशन करण्यासाठी तो शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तिच्या बोल्डनेसचे कौतुक करत आहेत, तिथे अनेक लोक जॉर्जियाची तुलना उर्फीशी करत आहेत आणि तिचा बोल्डनेस उर्फीपेक्षा दोन हात पुढे निघाल्याचं बोलत आहे. तर काहींना ती नोराची कॉपी करत असल्याचं वाटतयं.जॉर्जियाच्या व्हिडिओवर लोक सतत कमेंट करत आहेत आणि तिला मलायकापेक्षा हॉट म्हणत आहेत