आपला आवडता चित्रपट 'मुघले आझम', राज्यपाल हरवले चंदेरी आठवणीत |Governor Koshyari inaugurates Seminar I | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagat Singh Koshyari

आपला आवडता चित्रपट 'मुघले आझम', राज्यपाल हरवले चंदेरी आठवणीत

Bollywood Movies: मुंबईतील राजभवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये राज्यपालांनी बॉलीवूडला आता हॉलीवूडचे वेध लागले आहे. असे सांगत (Raj Bhavan) आपल्या चित्रपटांना जगभर पसंती मिळताना दिसते आहे. त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे. शाहरुख आणि काजोलच्या चित्रपटांनी भारतीय प्रेक्षकांना निखळ आनंद दिला आहे. (Bollywood Actor) दुसरीकडे छपाक साऱख्या चित्रपटांनी समाजात वेगळा संदेश दिला आहे. अशा प्रकारची चर्चा आणि उदाहरणं या सोहळ्यामध्ये मान्यवरांनी दिली. त्यासगळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे वक्तव्य सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. (entertainment news) आपल्या चित्रपटविषयक गोड आठवणींना कोश्यारी यांनी उजाळा देऊन उपस्थितांची चांगलीच दाद मिळवल्याचे दिसून आले. राज्यपाल काय म्हणाले हे आपण जाणून घेणार आहोत.

समाजाचा वेगळा आयाम, दिशा देण्याचे सामर्थ्य हिंदी चित्रपटांमध्ये आहे. त्यांना मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. अशावेळी त्या चित्रपटांना भारतभर स्विकारण्यातही आले. असे आपल्याला दिसून येते. असं मत मान्यवरांनी व्यक्त केले. राजभवनात इंडियन सिनेमा एंड सॉफ्ट पावर’ या कार्यक्रमामध्ये इंडियन काउंसिल फॉर कल्चरल रिलेशन्सचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे उपस्थित होते. गेल्या तीन दशकांत आपल्या देशातील सांस्कृतिकीकरणात मोठा बदल झाला असे आपल्याला दिसून येईल. 1976 मध्ये श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या मंथनपासून एका वेगळ्या धारेच्या चित्रपटांच्या प्रयोगशीलतेला उधाण आले. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता.

हेही वाचा: Video Viral: मॅक्सवेलच्या पार्टीत कोहली झाला 'पुष्पा'

राज्यपाल म्हणाले, चित्रपट ही एक क्रिएटिव्ह आर्ट आहे. त्याचा वापर संवेदनशीलपणे व्हायला हवा. आपण जे मारधाड चित्रपट पाहतो त्यात देखील क्रिएटिव्हीटी असते. मी फारसे चित्रपट पाहत नाही. पण मुघले आझम दोनदा पाहिला आहे. आपल्या चित्रपटांच्याबाबत बोलायचे झाल्यास मला कळले आहे की, आपला चित्रपट आता जागतिक पातळीवरील अनेक चित्रपटांना टक्कर देण्यास तयार झाला आहे. अमेरिका, मॉरिशियस यासारख्या विविध देशांमध्ये मी हिंदी चित्रपटांविषयी बोलताना लोकांना पाहिले आहे. त्यांना ते आवडते. बॉलीवूडचा प्रभाव मोठा आहे हे विसरता येणार नाही. असे कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

Web Title: Governor Koshyari Inaugurates Seminar Indian Cinema And Soft Power Comment On Bollywood Movies

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top