पानिपत सिनेमाच्या प्रदर्शनाला मुंबई उच्च न्यायालयाचा हिरवा कंदिल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

पानिपत सिनेमाच्या प्रदर्शनाला आज (ता. ०३) मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दिला. साहित्यिक विश्वास पाटील यांनी सिनेमावर त्यांच्या पानिपत कांदबरीतील पात्र आणि प्रसंग व मूळ कल्पना चोरल्याचा आरोप केला होता. मात्र, निर्माता आशुतोष गोवारीकर यांच्या वतीने या आरोपांचे खंडन करण्यात आले.

मुंबई - पानिपत सिनेमाच्या प्रदर्शनाला आज (ता. ०३) मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दिला. साहित्यिक विश्वास पाटील यांनी सिनेमावर त्यांच्या पानिपत कांदबरीतील पात्र आणि प्रसंग व मूळ कल्पना चोरल्याचा आरोप केला होता. मात्र, निर्माता आशुतोष गोवारीकर यांच्या वतीने या आरोपांचे खंडन करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

रिलीज झालेल्या तीन मिनिटाच्या ट्रेलरवरुन यामध्ये साधर्म्य असल्याचे स्पष्ट होत नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. मात्र, सिनेमा पाहिल्यावर याबाबत आक्षेप असल्यास याचिकादार पुन्हा न्यायालयात दाद मागू शकतात, असे ही न्यायालयाने म्हटले आहे.

पानिपतच्या कलाकारांची पुण्यात रंगली मैफल

येत्या ६ डिसेंबर रोजी पानिपत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. पानिपत कांदबरी मराठी, हिन्दी, कन्नड, इंग्रजी आदी भाषामध्ये असून रणांगण हे नाटकही आले होते. विश्वास पाटील लिखित या कादंबरीतील पात्र आणि मजकूर चोरला असल्याचा आरोप करत या सिनेमाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ती आज न्यायालयाने फेटाळली असून सिनेमाला हिरवा कंदिल दाखवला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Green signal from High Court of Mumbai for Panipat Cinema release