'मरेंगे तो वही जाकर जहाँ जिंदगी है', स्थलांतरित मजुरांच्या दुर्दशेवर गुलजार यांची संवेदनशील कविता

GULZAR
GULZAR

मुंबई- बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार, लेखक आणि दिग्दर्शक गुलजार सामाजिक मुद्द्यांवर अत्यंत संवेदनशील लिखाण करतात. त्यांचं मत स्पष्टपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. नुकतीच कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी मजुर कामगार आपल्या घरी परतण्यासाठी असहाय्य आहेत. अशांतच गुलजार यांनी या स्थलांतरित मजुरांच्या दुर्दशेवर एक अतिशय संवेदनशील कविता लिहिली आहे.

गुलजार यांनी या कवितेचा व्हिडिओ त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. त्यांनी घरी परतणा-या या असहाय्य मजुरांची दुर्दशा आणि त्यांच्या प्रती दुःख व्यक्त करत 'मरेंगे तो वहीं जाकर, जहाँ जिंदगी है' या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.गुलजार यांनी या कवितेमधून सध्याच्या लॉकडाऊनमधल्या परिस्थितीचं वर्णन केलं आहे ज्यात असहाय्य मजुर या कठीण परिस्थितीतून जात आहेत. या कवितेत स्थलांतरित मजुरांचं त्यांच्या घरी जाण्याचं दुःख आणि वेदना यांचा समावेश आहे. 

जेव्हा पासून लॉकडाऊन सुरु झालं आहे तेव्हापासून मोठ्या प्रमाणात मजुर बेरोजगार झाले आहेत. इतकंच नाही तर हाताला काम नसल्याने त्यांना त्यांच्या कुटुंबाची चिंता वाटतेय. दररोजची दिवसावर असलेली कमाई बंद झाल्याने त्यांच्यासोबतंच त्यांच्या लहान लेकरांचे देखील हाल होताना दिसतायेत. म्हणून हे सगळे मजूर त्यांच्या गावी परतण्यासाठी शेकडो मैल पायी प्रवास करत आहेत.

गल्लोगल्लीतून रेल्वेरुळ, हायवेवर पायपीट करत त्यांचा सगळा संसार घेऊन जातानाचे त्यांचे फोटो पाहून मन सुन्न होतं. या स्थलांतरित मजुरांसाठी सरकारतर्फे वेळीच योग्य पाऊल उचलले न गेल्याने मिडीया आणि सामान्य लोक टीका करत आहेत. त्यानंतर आत्ताकुठे केंद्र आणि राज्य सरकारने या मजुरांसाठी त्यांच्या घरी जाण्याच्या व्यवस्थेची सोय केली आहे.  

gulzar writes a poem in plight of migrant workers amid corornavirus lockdown  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com