Happy Birthday Amitabh Bachchan : ही आहेत 'बिग बीं'ची 'Top 10' गाणी!

टीम ईसकाळ
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

ही आहेत 'बिग बीं'ची टॉप टेन गाणी...

भारतीय चित्रपटातील शेहनशहा, अँग्री यंग मॅन आणि बिग बी अशा वेगवेगळ्या नावांनी परिचित असलेल्या 'द ग्रेट' अमिताभ बच्चन यांचा आज 77वा वाढदिवस! अमिताभ बच्चन यांनी 70च्या दशकापासून ते आजतागायत आपल्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आजही 'कौन बनेगा करोडपती'च्या माध्यमातून त्यांचा सळसळता उत्साह आपण बघतो. त्यांच्या अभिनयासह बिग बींची गाणीही गाजली. आजही त्यांची गाणी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. 

अन् 'त्या' रात्री असे काय घडलं ज्यामुळे अमिताभपासून रेखा दूर झाल्या

अमिताभ यांच्यासोबत रेखा, जया, जया प्रदा, राखी, हेमामालिनी, झिनत अमान, परवीन बाबी, स्मिता पाटील यांनी साकारलेली गाणी प्रेक्षकांच्या मनात रूजली. किशोर कुमार, मोहम्मद रफी यांचा मधुर आवाज आणि स्क्रिनवर सुंदर अभिनेत्रींसह अमिताभ! चला तर मग अमिताभ यांच्या हटके गाण्यांची सफर करू...

रेखा-अमिताभ कधी सुरू झाला ‘सिलसिला’?

ही आहेत 'बिग बीं'ची टॉप टेन गाणी...

1. कभी कभी मेरे दिल में खयाल आता है

2. खई के पान बनारसवाला... 

3. तेरे मेरे मिलन की ये रैना

4. दो लफ्जो की है दिल की कहानी...

5. ये दोस्ती हम नही छोडेंगे

6. रंग बरसे भिगे चुनरवाली 

7. सलामे इश्क मेरी जाँन

8. इन्तेहा हो गयी इन्तजार की

9. जुम्मा चुम्मा दे दे

10. आज रपट जाये तो 

अमिताभ यांनी काही दिवसांपूर्वी वजीर या सिनेमात गाणं म्हणले सुद्धा होतं...

11. अतरंगी यारी

अमिताभ बच्चन यांची ही गाणी आजही लहानांपासून मोठ्यांच्या मनामनात रूजलेली आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: happy birthday amitabh bachchan Top tens songs of Amitabh Bachchan on his birth day