esakal | 'जन्मदिनाचं कसलं आलं कौतूक', सडेतोड राम कपूर
sakal

बोलून बातमी शोधा

'जन्मदिनाचं कसलं आलं कौतूक', सडेतोड राम कपूर

'जन्मदिनाचं कसलं आलं कौतूक', सडेतोड राम कपूर

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मुंबई - अभिनेता राम कपूर actor ram kapoor हा त्याच्या वेगळ्या प्रकारच्या अभिनयामुळे प्रसिद्ध आहे. तो सोशल मीडियावर सक्रिय असणारा अभिनेता आहे. त्याचा फॅन क्लबही मोठा आहे. चित्रपटांपेक्षा त्यानं मालिकांमधून मोठं नाव कमावलं आहे. आज त्याचा बर्थ डे आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यानं चाहत्याशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यानं जन्मदिवस आणि त्याविषयीच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला आहे. राम हा आता ४८ वर्षांचा होणार आहे. त्याचा जन्म १ सप्टेंबरला झाला. कसम से नावाच्या मालिकेपासून त्याच्या करिअरला सुरुवात झाली होती.

त्यानं त्या मालिकेमध्ये जय वालिया नावाची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यानं बडे अच्छे लगते है नावाच्या मालिकेतही भूमिका केली. त्यामध्ये त्यानं कुवर अमर नाथ सिंग यांची भूमिका केली होती. त्यांची अभिनय शैली प्रेक्षकांना कमालीची आवडली होती. त्या मालिकेनं त्याला स्टार बनवलं. त्याच्या दमदार अभिनय शैलीनं प्रेक्षकांना वेड लावलं होतं. टीव्ही सोबत रामनं काही चित्रपटांमध्ये देखील वेगवेगळया भूमिका केल्या. त्यानं राखी सावंतच्या रियॅलिटी शो ला देखील होस्ट केलं होतं. राम कपूरचं असं म्हणणं आहे की, आयुष्याचा आनंद उपभोगताना कुठल्याही एका स्पेसिफिक तारखेची गरज नाही. त्यात महत्वाचा असतो तो आनंद. हे आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आपण वास्तविकतेकडे दुर्लक्ष करतो आणि भूतकाळात अडकून पडतो. यामुळे घोळ होतो. अशी भावना देखील रामनं यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा: 200 कोटी घोटाळा प्रकरण : जॅकलीन होणार 'माफीची साक्षीदार'

हेही वाचा: शहनाजचं आतापर्यतचं सर्वात 'बोल्ड' फोटो शूट

रामनं एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितले होते की, माझ्यासाठी जन्मदिवस हा काही फार मोठा दिवस नाही. वय हा देखील माझ्याकरिता महत्वाचा विषय नाही. माझे वडिल हे नेहमी मला सांगायचे की, जीवनातील उत्सव हा काही ठराविक एकाच दिवशी साजरा केला गेला पाहिजे असा नियम नाही. आपण बऱ्याचदा चूकीच्या गोष्टींना फॉलो करतो. त्याचा परिणाम आपल्या वर्तनावर होतो. प्रश्न हा काही कोणत्या तारखेचा नसतोच मुळी. आपण अनेकदा परिस्थिती अवघड करुन ठेवतो. त्यामुळे साध्या सोप्या पद्धतीनं जगता यायला हवं. असं माझे वडिल मला नेहमी सांगायचे. अशी आठवण रामनं यावेळी व्यक्त केली.

loading image
go to top