esakal | बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने KKR साठी मोजले होते 367 कोटी; आज ब्रँड व्हॅल्यू किती?
sakal

बोलून बातमी शोधा

happy birthday shahrukh ipl  kkr brand value

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख आज 2 नोव्हेंबरला त्याचा 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याची मालकी असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सने यंदाच्या हंगामात 14 पैकी 7 सामने जिंकले आहेत. मात्र प्लेऑफ गाठणं आता जर तरच्या समीकरणांवर अवलंबून आहे. 

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने KKR साठी मोजले होते 367 कोटी; आज ब्रँड व्हॅल्यू किती?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - बॉलिवूडचा किंग खान शाहरूख आज 2 नोव्हेंबरला त्याचा 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. चित्रपटसृष्टीबाहेर त्याने क्रिकेटमध्येही आयपीएलमधून पाऊल टाकलं आहे. शाहरुख खानची मालकी असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सने यंदाच्या हंगामात 14 पैकी 7 सामने जिंकले आहेत. मात्र प्लेऑफ गाठणं आता जर तरच्या समीकरणांवर अवलंबून आहे. इतर संघांचे उरलेले सामने आणि रनरेट यांच्या आधारावर ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2007 मध्ये टी20 स्पर्धेची घोषणा केली आणि यामध्ये आठ संघांसाठी बोली लावण्यात आली. तेव्हा शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि अभिनेत्री जूही चावलासह तिच्या पतीने भागिदारी करून तेव्हा 367 कोटी रुपयांमध्ये कोलकाताची फ्रँचाइजी खरेदी केली. 

शाहरुखने खरेदी केलेल्या संघाचे नाव कोलकाता नाइट रायडर्स असं ठेवलं. तेव्हा भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सौरव गांगुलीला संघाचा कर्णधार केलं होतं. याशिवाय ऑस्ट्रेलियाला दोन वेळा जगज्जेता बनवणाऱ्या जॉन बुकानन यांना प्रशिक्षक केलं होतं. गांगुलीशिवाय त्यावेळी संघात रिकी पाँटिंग, ब्रँडन मॅक्युलन, ख्रिस गेल, शोएब अख्तर आणि उमर गुल यांसाऱखे खेळाडू होते. तरीही संघाला फारशी चमक दाखवता आली नव्हती. 

कोलकाता नाइट रायडर्स 2008 मध्ये सहाव्या स्थानी होती. त्यानंतर 2009 मध्ये आठव्या तर 2010 मध्ये सहाव्या स्थानी होता.  केकेआरने गांगुलीला कर्णधारपदावरून हटवून गौतम गंभीरकडे नेतृत्व सोपवलं. त्यानंतर 2011 मध्ये कोलकाताने प्लेऑफमध्ये धडक मारली. तर 2012 आणि 2014 मध्ये विजेतेपदही पटकावलं होतं. 2014 मध्ये पॉइंट टेबलमध्ये केकेआर सातव्या स्थानी होती. त्यानंतर 2015 मध्ये पाचव्या स्थानी समाधान मानावं लागलं होतं. 2016 ते 2018 सलग तीनवर्षे केकेआर प्लेऑफमध्ये पोहोचली होती. गेल्या वर्षीही पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. 

वाचा - तीन महिन्याचा 'छोटा हार्दिक पांड्या' पाहिलायं, कसला क्युट दिसतोय

2007 मध्ये 367 कोटी रुपयांना खरेदी केलेल्या कोलकाता नाइट रायडर्सची ब्रँड व्हॅल्यू 12 वर्षात 630 कोटी रुपये इतकी झाली आहे. गेल्या वर्षीच्या आयपीएलनंतर संघाला मोठं नुकासन झालं मात्र तरीही यंदा ब्रँड व्हॅल्यू 630 कोटी रुपये इतकी आहे. गंभीरने संघाला रामराम केल्यानंतर केकेआरच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये घसरण झाली होती. 2018 मध्ये केकेआरची ब्रँड व्हॅल्यू 686 कोटी रुपयांवर पोहोचली होती.