हम तुम एक कमरे में बंद हो अन्...

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 मार्च 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर संपूर्ण देश घरात बसला असताना क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबतचा एक खास फोटो त्याची प्रेयसी नताशा स्टॅन्कोविच हिने शेअर केला आहे.

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर संपूर्ण देश घरात बसला असताना क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबतचा एक खास फोटो त्याची प्रेयसी नताशा स्टॅन्कोविच हिने शेअर केला आहे.

दोघांना हॉटेलमध्ये जाताना पाहिले अन्...

नताशा स्टॅन्कोविचने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या छायाचित्रात दोघेही आपल्या कुत्र्यासोबत बेडवर निवांत पडलेले दिसत आहेत. हा खास फोटो शेअर करताना नताशाने करोनाच्या फटक्यापासून सर्वांनी सुरक्षित राहा, असे आवाहनही केले आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून नताशा आणि हार्दिक एकमेकांना डेट करत आहेत. मध्यंतरीच त्यांनी साखरपुडाही उरकला आहे. नताशा ही एक सर्बियन अभिनेत्री, मॉडेल आणि नर्तिका आहे. प्रकाश झा दिग्दर्शित ‘सत्याग्रह’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#stayhomestaysafe #quarantine @hardikpandya93

A post shared by Nataša Stanković (@natasastankovic__) on

दरम्यान, जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात मंगळवारी (ता. 24) मध्यरात्रीपासून 24 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. करोनासारख्या महारोगाने जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल केले आहे. त्या राष्ट्रांकडे अत्याधुनिक साधने असूनही हा आजार वेगाने पसरत आहे. त्यामुळे संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली.

Video:नवऱ्याच्या वर्क फ्रॉम होमला वैतागली बायको...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hardik pandya and natasa stankovic share romantic photo with dog puppyhardik pandya and natasa stankovic share romantic photo with dog puppy